मुंबई : जगभरातील भांडवली बाजारात सकारात्मकता पाहता, बहरलेल्या समभाग खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी भावनिकदृष्टय़ा अनुक्रमे ६०,००० आणि १८,००० या महत्त्वपूर्ण पातळय़ा सोमवारच्या सत्रात निर्णायकपणे ओलांडल्या. बाजारात तेजीवाल्यांकडून खरेदीचा जोर इतका जबरदस्त होता की, घसरणारा रुपया आणि दिवसभरावर येऊन ठेपलेला अमेरिकेतील व्याजदर वाढीचा निर्णय या चिंतांचा त्यावर कोणताही परिणाम दिसून आला नाही. सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांकांनी नोंदविलेली ही वाढ आहे.

इतके दिवस पाठ फिरवलेल्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून झालेल्या खरेदीच्या परिणामी, सोमवारच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८६.७४ अंशांनी किंवा १.३१ टक्क्यांनी वाढून ६०,७४६.५९ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात ८२६.८५ अंशांच्या कमाईसह सेन्सेक्सने ६०,७८६.७० असा उच्चांकही दाखविला. याच धर्तीवर, व्यापक प्रतिनिधित्व असणाऱ्या निफ्टी निर्देशांकाने २२५.४० अंशांनी किंवा १.२७ टक्क्यांनी वाढून १८,०१२.२० वर दिवसांतील व्यवहारांना निरोप दिला.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात

अल्ट्राटेक सिमेंट ४.१८ टक्क्यांच्या मूल्यवाढीसह सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढ साधणारा समभाग ठरला. त्यानंतर या यादीत एचडीएफसी, सन फार्मा, मिहद्र अँड मिहद्र, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसव्‍‌र्ह आणि बजाज फायनान्स असा क्रम राहिला. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ तीन समभाग – डॉ. रेड्डीज, एनटीपीसी आणि इंडसइंड बँक घसरणीसह बंद झाले.

या आठवडय़ात (बुधवारी) अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने अधिक आक्रमक व्याजदर वाढीच्या विपरीत अल्पशी दरवाढ करण्याची अपेक्षा गुंतवणूकदार करत आहेत. या आशावादामुळेच स्थानिक बाजारात समभाग खरेदीसह निर्देशांकांनी तीव्र स्वरूपात वाढ साधली आणि दोन्ही निर्देशांकांना महत्त्वाच्या पातळय़ांपुढे झेप घेता आली. त्याचप्रमाणे, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे बाजारात वाढलेल्या स्वारस्यानेही गुंतवणूकदारांच्या एकंदर मनोबल वाढवले आहे, असे निरीक्षण कोटक सिक्युरिटीजेचे समभाग संशोधनप्रमुख श्रीकांत चौहान यांनी नोंदविले. तथापि ‘फेड’ने कोणतीही कठोर भूमिका स्वीकारल्यास, नजीकच्या काळात बाजारपेठेत मोठी उलथापालथ होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप निर्देशांक १.२४ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.४५ टक्क्यांनी वाढले. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा मूडपालट होऊन त्यांच्याकडून खरेदी सुरू असून, शुक्रवारच्या सत्रातही त्यांनी १,५६८.७५ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. आशियातील इतरत्र, सोल (कोरिया) आणि जपानच्या टोकियोमधील बाजार निर्देशांक वाढले, तर शांघाय आणि हाँगकाँग निर्देशांक अल्पशा घसरणीसह स्थिरावले.