यापूर्वी २१ नोव्हेंबर २०१३ रोजी सेन्सेक्सने ४०६.०८ अशी एकाच दिवसाच्या व्यवहारातील सर्वोच्च गटांगळी नोंदविली आहे. मुंबई निर्देशांक दोन आठवडय़ांनंतर २१ हजारांखाली आला आहे. कालच्या किरकोळ वाढीनंतर दिवसाची सुरुवात तेजीसह करणारा सेन्सेक्स सुरुवातीलाच १९० अंशांची झेप घेत होता. या वेळी २१,३३१.३२ या दिवसाच्या सर्वोच्च टप्प्यावर तो होता. रिलायन्स, एल अॅण्ड टी अशा आघाडीच्या कंपनी समभागांना गुंतवणूकदारांकडून मागणी होती. बँक, ऊर्जा, बांधकाम आदी क्षेत्रांतील समभागांची जोरदार विक्री झाली. सेन्सेक्समधील तब्बल २५ कंपनी समभाग खालावले, तर केवळ माहिती तंत्रज्ञान (आयटी) निर्देशांक वधारणेत जमा राहिला. दिवसाचा उच्चांक ते नीचांक ही दरी सुमारे ४८५ अंशांची राहिली.
गुंतवणूकदारांची नफेखोरी प्रामुख्याने गेल्या वर्षांत सुमार कामगिरी करणाऱ्या मिड आणि स्मॉल कॅपमध्येच झाली. स्मॉल कॅप तर व्यवहारात तब्बल ४ टक्क्यांनी उंचावला. २०१३ मध्ये सेन्सेक्स ९ टक्क्यांनी घसरला असताना हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १.७ व २.० टक्क्यांनी खाली आले. निर्देशांक घसरणीत व्यवहारात डॉलरच्या तुलनेत ६२ च्या खाली गेलेल्या रुपयानेही हिस्सा राखला.
रुपया महिन्याच्या तळात!
मुंबई : महिन्याभरानंतर भारतीय चलनाने पुन्हा डॉलरच्या तुलनेत ३६ पैशांनी घसरत (-०.५८%) गुरुवारी चिंता निर्माण केली. प्रति डॉलर ६२च्या खाली जात ६२.२६ पर्यंत असे महिन्यापूर्वीच्या नीचांकाला ते गेले. अमेरिकेतील अर्थव्यवस्था सुधाराच्या पाश्र्वभमीवर आयातदारांकडून विदेशी चलनाची मागणी वाढल्याने रुपयावर अधिक दबाव निर्माण होत आहे. गुरुवारच्या व्यवहारात रुपयाचा प्रवास ६१.७४ ते ६२.२८ असा खालचा राहिला. रुपयाने कालच्या व्यवहारातही १० पैशांचे नुकसान सोसले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा