५०० अंशांपेक्षा अधिक रुपता सेन्सेक्सने गेल्या तीन महिन्यातील सर्वात मोठी आपटी सप्ताहारंभीच नोंदविली. तर निफ्टीतील सोमवारची घसरणही शुक्रवारच्या तुलनेत २ टक्क्य़ांपेक्षा अधिक राहिली. मुंबई निर्देशांकांने यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी व्यवहारातील सर्वात मोठी, ५४१ अंशांची आपटी नोंदविली होती. मुंबई शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत स्थिरावले. त्यातही बँक, वाहन, भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता, आरोग्यनिगा हे घसरणीत आघाडीवर होते. सेन्सेक्समधील केवळ विप्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर व एशियन पेण्ट्स हे तीनच समभाग मूल्यवाढीच्या यादीत स्थिरावले.
‘सर्किट ब्रेकर’ येथे का नाही?
चिनी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक एकाच व्यवहारात ७ टक्क्य़ांपर्यंत आपटल्यानंतर अवघ्या दोन तासातच तेथील व्यवहार बंद करण्यात आले. तेथे मर्यादा असलेल्या ५ टक्क्य़ांपेक्षा अधिक निर्देशांक आपटी झाल्याने हे ‘सर्किट ब्रेकर’ लागल्याने झाले. एखाद्या निर्देशांकात ठराविक प्रमाणात वाढ-घट झाल्यास ही तांत्रिक प्रक्रिया आपोआप कार्यान्वित होते.
चीन, आशियातील अन्य देशांमध्येही सोमवारी निर्देशांक पडझड झाल्यानंतर येथेही त्याचे सावट उमटले. येथील मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये एकाच व्यवहारात २ टक्क्य़ांपर्यंत आपटी अनुभवली गेली. मात्र बाजारातील व्यवहार ठप्प पडले नाहीत. कारण येथे, भारतात ती मर्यादा १०, १५ व २० टक्के अशा टप्प्यात आहे. येथे दुपारी १ पूर्वी १० टक्के वाढ अथवा घट झाली तर पहिले ४५ मिनिटांसाठी बाजारातील व्यवहार थांबविले जातात. ही स्थिती दुपारी १ ते २.३० दरम्यान निर्माण झाल्यास १५ मिनिटांचा विराम असतो. त्यानंतर तसे झाले तर व्यवहारच होत नाहीत.
एकाच व्यवहारातील १५ तसेच २० टक्क्य़ांपर्यंतची आपटी अथवा वधारणेकरिताही भिन्न कालावधी टप्पे आहेत.
निर्मिती क्षेत्राची अडीच वर्षांत प्रथमच घसरण
नवी दिल्ली : चीनमधील निर्मिती निर्देशांकाने तमाम भांडवली बाजारात पडझड निर्माण केली असतानाच भारताचाही गेल्या महिन्यातील अर्थप्रगतीची ही मोजपट्टी जाहीर झाली आहे. यानुसार डिसेंबरमध्ये देशाचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) ४९.१ टक्के नोंदला गेला आहे. तो गेल्या जवळपास अडीच महिन्यातील सुमार दर आहे. साधारणपणे ५० टक्के निर्देशांक हा समाधानकारक अर्थ प्रगतीचा समजला जातो. मात्र यंदा त्याने गेल्या तब्बल २८ महिन्यातील किमान स्तर गाठला आहे. आधीच्या, नोव्हेंबरमधील ५०.३ टक्क्य़ांच्या तुलनेत तो यंदा ४९.१ टक्क्य़ांवर आला आहे. मार्च २०१३ नंतरचा हा किमान स्तर आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये यापूर्वी तो ५० टक्क्य़ांखाली घसरला होता.
खनिज तेल :
आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांचा खनिज तेलावर विपरित परिणाम झाला. सौदी अरेबियाने इराणशी असलेले राजकीय सहकार्य संपुष्टात आणल्यानंतर एकूणच मध्य पूर्वेत तणावसदृश वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे महत्त्वाचे मानले जाणाऱ्या खनिज तेलाच्या दरांमध्ये उठाव दिसला. ब्रेन्ट तेल दीड टक्क्य़ाने वाढून प्रति पिंप ३८ डॉलरनजीक पोहोचले. इंधन उत्पादनात स्वयंपूर्ण होऊन निर्यातीवर भर देणाऱ्या अमेरिकेतील खनिज तेलही दरांबाबत जवळपास याच प्रमाणात भक्कम झाले. २०१५ मध्ये खनिज तेलाच्या किंमती तब्बल ३६ टक्क्य़ांनी कमी झाल्या होत्या.
सोने-चांदी :
मौल्यवान धातूतील दर चमक पुन्हा एकदा वाढली आहे. मुंबई स्टॅण्डर्ड सोने प्रकारचा धातू प्रति तोळा २९५ रुपयांनी वाढून २५,४६० रुपयांपुढे गेला. तर शुद्ध सोने दरही याच प्रमाणात वाढून १० ग्रॅमकरिता २५,४६० रुपयांवर गेले. चांदीचा किलोचा दर ३७५ रुपयांनी उंचावत ३४ हजारानजीक, ३३,९८५ रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने प्रति औन्स १,१०० पुढे गेल्याचे सोमवारी दिसले. त्यात एकाच व्यवहारात थेट एक टक्क्य़ाची वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर सोने दर प्रति औन्स गेली काही सलग सत्रे १,२०० डॉलरच्या दर दरम्यान फिरत होते.
डॉलर विरुद्ध रुपया :
परकी चलन विनियम मंचावर स्थानिक चलनाने सोमवारी कमालीची चिंता निर्माण केली. २०१६ च्या दुसऱ्या व्यवहारात डॉलरसमोर रुपया सोमवारी तब्बल ४७ पैशांनी आपटला. ६६.६१ वर येताना तो गेल्या पंधरवडय़ाच्या तळात विसावला. ६६.२५ या किमान स्तरावरच नव्या आठवडय़ाची सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ६६.६३ पर्यंत घसरला. दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेतील त्याची आपटी ही ०.७१ टक्क्य़ांची होती. यामुळे त्याची गेल्या सलग तीन व्यवहातील तेजीही सोमवारी थांबली. डॉलरसमोर विकसनशील देशांचे चलनमूल्य सोमवारी रोडावले आहे.