जागतिक अर्थसंकटाची चिंता वाहताना देशातील भांडवली बाजार सप्ताहअखेर जबर घसरणीसह बंद झाला. अमेरिकेतील चिंताजनक बनलेल्या वित्तीय स्थितीमुळे जगभरात सर्वच शेअर बाजार घसरले असताना, ‘सेन्सेक्स’सह ‘निफ्टी’ने सव्वा टक्क्यांची घट नोंदविली. उभय बाजारातील गेल्या दोन महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण होती.
अमेरिकेतील संभाव्य वित्तीय संकटाचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून नरम असलेला मुबई शेअर बाजाराने दुपारनंतर कमालीचा नकारात्मक कल दाखविला. दिवसातील १.०९% घसरणीमुळे ‘सेन्सेक्स’ १९,२४२ वर स्थिरावला. मुंबई निर्देशांकातील प्रमुख ३० पैकी २८ समभाग घसरले. तर ५० निवडक कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही ६८.७० अंशाने घसरत ५,८४७.७० पर्यंत खाली आला. लक्षणीय म्हणजे तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.४७% ने खाली आले.
फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन या युरोपीय क्षेत्रातील भांडवली बाजार ०.६५% घसरणीसह तर चीन, हाँगकाँग, जपान, तैवान, सिंगापूर, दक्षिण कोरिया येथील निर्देशांक ०.९९% पर्यंत घसरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा