शेअर बाजारात थरकाप
भारतीय निर्देशांकांची आपटी; गुंतवणूकदारांना ७ लाख कोटींचा फटका
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
आशियातील सर्वात मोठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या आर्थिक मंदीच्या वणव्यात सोमवारी भारतीय भांडवली बाजार पुरता पोळून निघाला. आशियाई बाजारातील पडझडीचा जोरदार फटका मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराला बसला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ७ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. सत्रातील तिसरी तर गेल्या सात वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. भांडवली व परकी बाजारात चिंतेचे चित्र असताना केंद्रीय अर्थमंत्री तसेच रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर व सेबी अध्यक्षांनी मात्र जागतिक तुलनेत देशांतर्गत अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा विश्वास गुंतवणूकदारांना देण्याचा प्रयत्न केला.
सोमवार बंदअखेरची सेन्सेक्सची घसरण ही २१ जानेवारी २००८ रोजीच्या २,०६२ अंश आपटीनंतरची सर्वात मोठी ठरली. यामुळे सेन्सेक्स २६ हजाराखाली आला. शिवाय गुंतवणूकदारांच्या ७ लाख कोटी रुपयांचेही नुकसान झाले. तर बाजारात सूचिबद्ध ५०० हून अधिक कंपन्यांनी त्यांचा मूल्यतळ गाठला.
लेहमन ब्रदर्सच्या रूपात (२००८) अमेरिकेत उद्भवलेल्या आर्थिक मंदीच्या कालावधीतील भांडवली बाजारातील घसरण भारतीय निर्देशांकांनी पुन्हा एकदा अनुभवली आणि येथे काळ्या सोमवारची काजळी पसरली. बाजारातील ही धग डॉलरच्या तुलनेत रुपयाला ६७ पर्यंत नेण्यातही निमित्तमात्र ठरली.
चीनमध्ये काही दिवसांपासून आर्थिक मंदीचे सावट आहे. असे असतानाच सोमवारी तेथे १० टक्क्यांच्या रूपात प्रमुख निर्देशांकांनी २००७ चा स्तर गाठला. एकूणच आशियाई बाजारात याचे सावट सकाळच्या व्यवहारात उमटले असतानाच नव्या सप्ताहाची सुरुवात मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराने पडझडीने केली.
शेअर बाजारात लक्षणीय घसरण, गुंतवणूकदारांना फटका
आशियातील सर्वात मोठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या आर्थिक मंदीच्या वणव्यात सोमवारी भारतीय भांडवली बाजार पुरता पोळून निघाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-08-2015 at 03:45 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex down over 1600 points on weak global cues