महिन्यातील वायदापूर्तीच्या दिवशी नफेखोरीचा अवलंब करत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्समध्ये बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण दिसून आली. २९७.८५ अंशांच्या घसरणीने सप्ताहातील सर्वात मोठी आपटी राखणारा सेन्सेक्स बुधवारी दिवसअखेर २७,२०८.६१ वर स्थिरावला. ९२.९० अंश घसरणीने निफ्टी ८,२०० चा टप्पा सोडत ८,१७४.१० वर थांबला.
भांडवली बाजारात नफेखोरीबरोबरच सत्रात डॉलरच्या तुलनेत ६३.५० पर्यंत घसरणाऱ्या रुपयानेही दबाव निर्माण केला. काहीशी नरम सुरुवात करताना सेन्सेक्स व्यवहारात २७,१४६.५२ पर्यंत घसरला. दिवसअखेरची जवळपास ३०० अंशांची घसरण ही १६ डिसेंबरनंतरची एकाच व्यवहारातील सर्वात मोठी घसरण ठरली. या वेळी बाजार एकाच सत्रात ५३८.१२ अंशांनी कोसळला होता.
सेन्सेक्समधील केवळ तीनच समभाग वधारले. सेसा स्टरलाइट, टाटा स्टील व आयसीआयसीआय बँक यांचा त्यात समावेश राहिला. तर भेल, गेल, ओएनजीसी यांचे समभाग मूल्य मोठय़ा फरकाने घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सावरत असल्याने सूचिबद्ध तेल व वायू क्षेत्रातील समभागांची विक्री करत गुंतवणूकदारांनी नफा कमाविला. १.३८ टक्क्यांसह माहिती व तंत्रज्ञान निर्देशांक घसरणीत आघाडीवर राहिला.
नफेखोरीने सेन्सेक्स-निफ्टीची घसरण
महिन्यातील वायदापूर्तीच्या दिवशी नफेखोरीचा अवलंब करत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्समध्ये बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण दिसून आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-12-2014 at 03:24 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex drops 297 points nifty slips below