सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये अर्धशतकी भर पडली. ५२.७२ अंश वाढीने निर्देशांक गुरुवारी २८,४३८.९१ वर पोहोचला. निफ्टीत १८.४५ अंश वाढ होऊन हा निर्देशांक ८,५०० नजीक, ८,४९४.२० वर स्थिरावला. महिन्यातील अखेरचा गुरुवार म्हणजे वायदापूर्तीचा दिवस होता. परिणामी या सत्रातही गुंतवणूकदारांनी खरेदीचे धोरण कायम ठेवले. त्यातून सेन्सेक्सला बुधवारच्या तुलनेत जवळपास २०० अंश वर उच्चांकही नमूद करता आला. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण पुढील आठवडय़ात जाहीर होत असताना शुक्रवारी जारी होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीतील देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीवरही गुंतवणूकदारांची नजर असल्याचे बाजारातील व्यवहारावरून दिसून आले. सेन्सेक्समधील इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, भेल, महिंद्र, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज, हिंदाल्को या समभागांना मागणी राहिली. स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही अनुक्रमे ०.५५ व ०.५१ टक्क्यांनी उंचावले.
रुपया पुन्हा घसरणीला
म्मुंबई: गेल्या दोन दिवसांत सावरलेला रुपया पुन्हा उतरणीला लागला. डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ६२ नजीक, ६१.९२ पर्यंत आपटला होता. दिवसअखेर तो काहीसा सावरला असला तरी बुधवारच्या तुलनेत त्याने ३ पैशांनी घसरत ६१.८७ वर विश्रांती घेतली.

Story img Loader