भक्कम होत असलेल्या अमेरिकी डॉलरचा लाभ लक्षात घेत गुंतवणूकदारांनी औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञानसारख्या कंपन्यांकडे कल दाखविल्याने मुंबई शेअर बाजारात बुधवारी शतकी अंशवाढ नोंदली गेली. परिणामी सेन्सेक्स २८ हजारांनजीक पोहोचण्यात यशस्वी ठरला.
१००.१० अंश वाढीने २७,९३१.६४ पर्यंत मजल मारताना मुंबई निर्देशांकाने गेल्या दोन व्यवहारांतील घसरणही थोपवून धरली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सत्रअखेर २८.६० अंश वाढ होऊन निर्देशांक ८,४९५.१५ वर पोहोचला. यामुळे देशातील सर्वात मोठा बाजार पुन्हा एकदा त्याच्या ८,५०० नजीक पोहोचला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा गेल्या काही सत्रांपासून घसरणीचा प्रवास बुधवारच्या सुरुवातीच्या व्यवहारातच ६५.४४ या गेल्या दोन वर्षांच्या तळात पोहोचला. दिवसअखेर त्यात मंगळवारच्या तुलनेत ४ पैशांची भर पडली असली तरी भांडवली बाजारात मात्र दिवसभर त्याचे सावट दिसले. भक्कम होत असलेल्या डॉलरमुळे लाभदायी अशा औषधनिर्माण तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांकरिता गुंतवणूकदारांनी मागणी नोंदविली.
सेन्सेक्सनेही सत्रात २८ हजारांचा पल्ला गाठत व्यवहारातील २८,०२१.३९ पर्यंत मजल मारली. मुंबई निर्देशांक गेल्या दोन व्यवहारांत २३५.७७ अंशांनी घसरला होता. तर बुधवारच्या व्यवहारात निफ्टी ८,५२०.४५ पर्यंत झेपावला. मुंबईबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजारही त्याच्या अनोख्या टप्प्यावर मात्र स्थिर राहू शकले नाहीत.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही पाव टक्क्यापर्यंत वाढले.
सार्वजनिक बँकांना मिळणाऱ्या सरकारी भांडवलामुळे सूचिबद्ध बँका तसेच खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या दरांमुळे सार्वजनिक तेल व वायू विपणन कंपन्यांना अधिक मागणी राहिली. व्याजदराशी निगडित काही समभागांनाही अधिक भाव मिळाला.
सेन्सेक्समध्ये ‘आरोग्यदायी’ शतकी भर
भक्कम होत असलेल्या अमेरिकी डॉलरचा लाभ लक्षात घेत गुंतवणूकदारांनी औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञानसारख्या कंपन्यांकडे कल दाखविल्याने मुंबई शेअर बाजारात बुधवारी शतकी अंशवाढ नोंदली गेली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2015 at 03:28 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex ends 100 points up at 27932 nifty closes at