नव्या सप्ताहाची सुरुवात करताना भांडवली बाजारात सोमवारी संमिश्र व्यवहार नोंदले गेले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७ अंशांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात नाममात्र वाढ राखली गेली. यापूर्वीच्या सलग दोन व्यवहारात सेन्सेक्स ३५२.४६ अंशांची वाढ नोंदविणारा ठरला आहे. बाजाराचा महिन्यातील अखेरचा दिवस असताना एकूण नोव्हेंबरमध्ये मुंबई निर्देशांक जवळपास दोन टक्क्य़ांनी घसरला आहे. ऑगस्टनंतरची ही मोठी मासिक निर्देशांक वाढ आहे.
सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील राष्ट्रीय सकल उत्पादनाचे आकडे व रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या व्याजदर निश्चितीच्या पतधोरणाकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भांडवली बाजाराची फारशी दखल घेतली नाही.
सेन्सेक्सच्या किरकोळ निर्देशांक वधारणेनंतरही मुंबई शेअर बाजारातील स्पाईसजेट, आयडीबीआय बँक, ईमामी पेपर, राजेश एक्स्पोर्ट्स यांचे समभाग लक्षणीयरित्या वाढले. येत्या तीन वर्षांतील २,००० कोटी रुपयांच्या गुंतवणूक धोरणाने ईमामी पेपरच्या समभागाला एकाच व्यवहारात तब्बल २० टक्के अधिक भाव मिळाला. तर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनला हिस्सा विकण्याच्या सरकारच्या चर्चेनंतर सार्वजनिक आयडीबीआय बँकेचे समभाग मूल्य व्यवहारअखेर ८ टक्क्य़ांपर्यंत झेपावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा