सलग चौथ्या व्यवहारात तेजी नोंदविताना सेन्सेक्स व निफ्टी बुधवारी अनुक्रमे २८,७०० व ८७०० पुढे गेले. प्रमुख निर्देशांक आता गेल्या तीन आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर आहेत.
१९१.१६ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,७०७.७५, तर ५४.१० अंश वाढीसह निफ्टी ८७१४.१० वर बंद झाला. निर्देशांकांनी १७ मार्चनंतर प्रथमच हा टप्पा गाठला आहे.
मुंबई निर्देशांकात या चार सत्रात ७५०.२६ अंश भर पडली आहे. बुधवारी २८,६०१.४९ या वरच्या टप्प्यावर खुले झालेल्या सेन्सेक्सने व्यवहारात २८,७६३.०६ पर्यंत मजल मारली.
व्याजदर स्थिर ठेवणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने वार्षिक पतधोरणात देशाच्या उंचावणाऱ्या विकास दराबाबत केलेले भाष्य गुंतवणूकदारांना समभागांची खरेदी करण्यास भाग पडले.
सेन्सेक्समधील रिलायन्स, इन्फोसिस, कोल इंडिया, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज, गेल, आयटीसी समभागांचे मूल्य वाढले. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी २१ समभाग तेजीत होते.
प्रमुख बँकांनी व्याजदर कपातीला सुरुवात केल्यानंतर या क्षेत्राशी निगडित बँक, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली.
एकूण बँक निर्देशांक मात्र घसरणीसह प्रमुख १२ वाढणाऱ्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वेगळा राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान सर्वाधिक १.९८ टक्क्य़ांसह वाढला.e04कोल इंडिया सहा टक्क्य़ांनी उंचावला
ई-लिलाव विक्रीसाठीची मर्यादा हटण्याच्या शक्यतेने कोल इंडियाच्या समभागाने बुधवारी मुंबई शेअर बाजारात तब्बल ६ टक्क्य़ांपर्यंत झेप घेतली. या व्यवहारामुळे कंपनीचे बाजारमूल्यही एकाच सत्रात १३,००० कोटी रुपयांनी वाढले. नवी पद्धती अवलंबत कंपनीच्या ई-लिलाव विक्रीची मर्यादा वाढविण्याच्या विचारात सरकार असल्याची चर्चा सुरू झाल्याने कंपनीचा समभाग व्यवहारात ६.३७ टक्क्य़ांपर्यंत उसळला. यावेळी त्याला ३८२.३० रुपयांचे मूल्य प्राप्त झाले. दिवसअखेर ५.७३ टक्के मूल्यवाढीसह ३८० रुपयांवर स्थिरावताना तो सेन्सेक्समध्ये सर्वात वरच्या स्थानावर राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा