सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात नव्या उच्चांकाला पोहोचलेला शेअर बाजार दिवसअखेर मात्र या टप्प्यापासून दुरावला. व्यवहारात सर्वोच्च अशा २२,०७९.९६ अंशांपर्यंत पोहोचलेला सेन्सेक्सने कालच्या तुलनेत मामुली ०.२७ अंशाने घसरत २२,०५५.२१ वर विश्रांती घेतली. तरी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मात्र विक्रमी आगेकूच सलग दुसऱ्या व्यवहारात कायम राखली. सोमवारच्या तुलनेत ६.२५ अंश वाढीसह तो ६,५८९.७५ या नव्या टप्प्यावर पोहोचला. सोमवारी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी उसळी घेत नव्या सप्ताहास प्रारंभ केला होता. या दिवशी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,४६५.६२ कोटी रुपयांची खरेदी केली. मंगळवारच्या व्यवहारात मात्र एकंदर उलाढाल ओसरलेली व बाजारात सुस्ती दिसून आली. तेल व वायू वगळता इतर जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ नोंदली गेली. सेन्सेक्समधील निम्मे समभाग घसरले.
सुस्त बाजारातही, ‘निफ्टी’ची उच्चांकी आगेकूच!
सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात नव्या उच्चांकाला पोहोचलेला शेअर बाजार दिवसअखेर मात्र या टप्प्यापासून दुरावला. व्यवहारात सर्वोच्च अशा २२,०७९.९६ अंशांपर्यंत पोहोचलेला सेन्सेक्सने कालच्या तुलनेत मामुली ०.२७ अंशाने घसरत २२,०५५.२१ वर विश्रांती घेतली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-03-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex ends flat nifty climbs to fresh high