गेल्या तीन आठवडय़ातील सर्वोत्तम निर्देशांक वाढ नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारात बुधवारी चौकशीच्या चर्चेतील रिलायन्सचा समभाग पूर्वपदावर आला, तर अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पाशी निगडित कंपन्यांचे समभागांचे मूल्य उतरले. ८५.१२ अंश वाढीसह सेन्सेक्स २०,४४८.४९ या २०,५०० टप्प्यानजीक पोहोचला. तर निफ्टी २१.३० अंश वधारणेसह ६,०८४ पर्यंत गेला. सेन्सेक्समधील बुधवारची वाढ ही २२ जानेवारीच्या ८६.५५ अंश झेपेसमकक्ष ठरली.
इंधन दरवाढीच्या चौकशीला सामोरे जावे लागणाऱ्या रिलायन्सचा समभाग मंगळवारी व्यवहारात दोन टक्क्यांपर्यंत आपटल्यानंतर बुधवारअखेर तो जवळपास याच प्रमाणात वधारला. सत्र संपुष्टात येताच कंपनी समभाग १.४८ टक्क्यांसह ८१७.४५ रुपयांवर गेला. व्यवहारात त्याचा उच्चांक मंगळवारच्या तुलनेत दोन टक्के अधिक, ८२१.८५ रुपयांवर होता.
कोणतीही प्रवासी व मालवाहतूक दरवाढ न झालेल्या यंदाच्या अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पाकडून फार काही आशा नसल्याच्या प्रतिक्रियेने गुंतवणूकदारांनी या क्षेत्राशी निगडित समभागांची विक्री केली. त्यांचे मूल्य व्यवहारात १० टक्क्यांपर्यंत आपटले होते.
रेल्वे समभाग गडगडले..
हिंद रेक्टिफायर्स    ” ३१.६५    १०.०९%
कर्नेक्स मायक्रोसिस्टीम्स    ” ३५.६०     ४.०४%
कालिंदी रेल निर्माण    ” ६५.१५     १.८१%
टिटागड व्हॅगन्स    ” १०३.९०    १.३३%

Story img Loader