स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वीपासून नकारात्मक सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराने अखेर त्याच्या ‘जैसे थे’ धोरणानंतरही नाराजी कायम ठेवली. मुंबई शेअर बाजार शतकी घसरणीसह यामुळे २८ हजारांवर येऊन ठेपला तर निफ्टीनेही ८,५०० नजीकचा प्रवास अनुभवला.
११५.१३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,०७१.९३ वर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २६.१५ अंश घसरणीसह ८,५१६.९० वर येऊन ठेपला. व्याजदराशी निगडित समभागांमध्ये संमिश्र मूल्य हालचाल नोंदली गेली.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्याजदरात कोणताही बदल न केल्याने भांडवली बाजारातील मंगळवारच्या घसरणीच्या व्यवहारामार्फत गेल्या चार व्यवहारांतील तेजी थांबली. मात्र मुंबई शेअर बाजारातील बँक निर्देशांकासह स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांनी तेजी नोंदविली. परकी विनियम चलन व्यासपीठावर डॉलरच्या तुलनेत भक्कम होऊ पाहत असलेल्या रुपयाचा हा परिणाम होता.
मुंबई शेअर बाजाराची गेल्या सलग चार व्यवहारांतील एकूण ७२७.८३ अंश राहिली होती. मंगळवारच्या सत्रा दरम्यान सातत्यातील घसरणीने सेन्सेक्स २८ हजारांनी खाली आला होता. त्याचा या वेळचा २७,८६६.१२ हा दिवसाचा तळ होता. तर व्यवहारात २८,२६४.७२ पर्यंतच तो मजल मारू शकला.
स्थिर व्याजदरामुळे निवडक बँक समभागांमध्ये मूल्य तेजी नोंदली गेली. एकूण बँक निर्देशांक +१०३.१२ अंश वाढीने : २१,८१४.८५ वर पोहोचला. तर व्याजदरात कपात न झाल्याने स्थावर मालमत्ता क्षेत्रातील अधिकांचे समभाग मूल्य रोडावले. वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये संमिश्र हालचाल नोंदली गेली.
रिझव्र्ह बँकेच्या महागाई कमी होण्याच्या तसेच विकासाचा वेग वाढण्याच्या अंदाजानंतरही स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्या मूल्यात घसरणच झाली. तर व्यवहारात ६४ च्या वर पोहोचलेल्या रुपयाचा परिणाम डॉलररूपात मोठा महसूल कमाविणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांच्या समभागांवर दबाव निर्माण झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभागांमध्ये घसरण झाली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक सर्वाधिक ०.७७ टक्क्यांसह घसरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा