शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचे सत्र सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. द्विमासिक पतधोरणात रिझव्र्ह बँकेने स्थिर व्याजदराचा अपेक्षित निर्णय घेतल्याने शेअर बाजारात सोमवारसारखेच चित्र दिसले.
सत्रात अस्थिरता नोंदविल्यानंतर सेन्सेक्सने ११५.६१ अंश घसरणीने २८,४४४.०१ पर्यंत अखेर केली. तर निफ्टीत ३१.२० अंश घट होऊन राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८५२४.७० वर स्थिरावला. डॉलरच्या कमकुवततेपोटी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी घसरणीत हिस्सा राखला.सप्ताहारंभी सेन्सेक्ससह निफ्टीने सर्वोच्च टप्प्यापासून माघार घेण्याचे धोरण अवलंबिले होते. गेल्या आठवडय़ात सर्वोच्च टप्प्यावर नेऊन ठेवणाऱ्या सेन्सेक्समध्ये जवळपास सव्वाशेहून अधिक अंशांची घसरण नोंदविण्यास गुंतवणूकदारांनी भाग पाडले.
मंगळवारी सलग पाचव्यांदा स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर होत असतानाही बाजार नरमच होता. व्यवहारात निफ्टीदेखील ८५६०.२०च्या पुढे जाऊ शकला नाही. तेल कंपन्यांचे समभागही विक्रीच्या क्रमवारीत समाविष्ट झाले. मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र अर्धा ते एक टक्का वधारणेत होते. सेन्सेक्समधील निम्म्या कंपन्यांचे समभाग मूल्य घसरले. माहिती निर्देशांक सर्वाधिक १.४८ टक्क्य़ांनी घसरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा