सेबी’च्या संभाव्य र्निबधांचा धसका
पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालाऐवजी सेबीने पी-नोट्सवरील र्निबध अधिक कडक केल्याचे सावट गुरुवारी भांडवली बाजारात उमटले. त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत व्याजदर वाढीच्या भीतीनेही गुंतवणूकदारांची गाळण उडाली. परिणामी एकाच व्यवहारात तब्ल ३०४.८९ अंशांनी खाली येत सेन्सेक्स २५,३९९.७२ या त्याच्या गेल्या पंधरवडय़ाच्या तळात विसावला, तर ८६.७५ अंश घसरण नोंदवीत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने त्याचा ७,८०० हा टप्पा सोडत ७,७८३.४० चा स्तर गाठला. दोन्ही निर्देशांकांत प्रत्येकी एक टक्क्य़ाहून अधिक आपटी नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाचा किमान स्तर यापूर्वी ६ मे रोजी होता.
पाच राज्यांतील विधानसभेचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. याबाबतच्या मतदानोत्तर चाचणीतील कौल जोरावर बाजाराने यापूर्वी तेजी नोंदविली होती. यानंतरच्या दोन व्यवहारांपासून मात्र त्यात घसरण झाली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीतून येत्या जूनमध्ये व्याजदर वाढविण्याचे संकेत मिळाल्यानेही बाजारात घसरण अनुभवली गेली. अमेरिकी अर्थव्यवस्था भक्कम होत असल्याची आर्थिक आकडेवारी लवकरच जाहीर होणार असल्याने ही व्याजदर वाढ अपेक्षित मानली जात आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांनी पुन्हा एकदा प्रति पिंप ५० डॉलरपासून फारकत घेतल्याचाही परिणाम बाजारावर झाला.
डॉलरच्या तुलनेत मोठय़ा फरकाने घसरत असलेल्या रुपयाचाही बाजारावर गुरुवारी दबाव निर्माण झाला. रुपया दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ६७ च्याही खाली घसरला. सेन्सेक्सने सत्रात २५,३५१.९९, तर निफ्टीने ७,७६६.८० सत्र तळ अनुभवला. बाजारातील गुंतवणुकीचे एक माध्यम असलेल्या पी-नोट्सकरिता ‘केवायसी’ नियम कडक करण्याकडे सेबीने संकेत दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा