सलग दुसऱ्या दिवशी अस्वस्थ व्यवहार होणाऱ्या भांडवली बाजारात गुरुवारअखेर किरकोळ घसरण नोंदली गेली. कमी होत असलेल्या महागाईच्या जोरावर रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांनी अखेर सेन्सेक्समध्ये ४५.०४ घसरण नोंदवित मुंबई निर्देशांकाला २७,२०६.०६ वर आणून ठेवले. तर ११.२५ अंश घसरणीमुळे निफ्टी ८,२२४.२० पर्यंत राहिला.व्यवहारात सेन्सेक्सने २७ हजार तर निफ्टीने ८,२०० खालचा तळ गाठून चिंता वाढविली. दिवसअखेर सेन्सेक्समधील हिंदाल्को, स्टेट बँक, बजाज ऑटो, टाटा स्टील यांच्या समभाग मूल्यात मात्र वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत अधिक भक्कम होत असलेल्या रुपयाचाही भांडवली बाजारातील तेजीवर परिणाम झाला. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप एक टक्क्य़ापर्यंत वाढले.
अस्वस्थ बाजाराची माफक घसरणीने अखेर
सलग दुसऱ्या दिवशी अस्वस्थ व्यवहार होणाऱ्या भांडवली बाजारात गुरुवारअखेर किरकोळ घसरण नोंदली गेली.
First published on: 15-05-2015 at 12:51 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex flat nifty ends above