मुंबई शेअर बाजाराने सप्ताहाची अखेर किरकोळ नुकसानीसह केली. आठवडय़ातील चार घसरणींमुळे साप्ताहिक तुलनेत मुंबई निर्देशांक सलग दुसऱ्या आठवडय़ात नकारात्मक स्थितीत आला आहे.
३३.७१ अंश घसरणीसह सेन्सेक्स शुक्रवारी २५,२२८.५० स्तरावर थांबला. तर २.०५ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सप्ताहअखेर ७,७३३.४५ वर विराम घेतला.
चालू आठवडय़ातील पाचपैकी चार सत्रांत सेन्सेक्स घसरला आहे. त्याची एकूण घसरण ३७८.१२ अंश राहिली आहे. तर निफ्टीचे नुकसान सप्ताहात ११६.४५ अंश राहिले.
मुंबई निर्देशांकाचा आठवडय़ातील शेवटच्या दिवसाचा प्रवास २५,०५७.९३ ते २५,२६०.४८ दरम्यान राहिला. सेन्सेक्सने गुरुवारी १६०.४८ अंश वाढ राखली होती. सोमवारपासून केवळ याच सत्रात बाजारात तेजी राहिली.
निफ्टीने शुक्रवारच्या सत्रात त्याचा ७,७०० हा अनोखा टप्पाही सोडला होता. व्यवहारात ७,६७८.३५ पर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक होता.
सेन्सेक्समधील आयटीसीचा समभाग कंपनीने सिगारेट उत्पादन ४ मेपासून थांबविल्याचे जाहीर केल्यानंतर ०.११ टक्क्याने घसरला. तिमाही नफ्यात मोठी घसरण नोंदविणाऱ्या एमसीएक्सचा समभागालाही ३.२५ टक्क्यांपर्यंत नुकसान सोसावे लागले. ७०.८५ टक्के नफा वाढ नोंदवूनही हिरो मोटोकॉर्पचा समभाग ०.७५ टक्क्यांनी खाली आला.
सेन्सेक्समधील ३० पैकी १७ समभागांचे मूल्य खालावले. यात डॉ. रेड्डीज, विप्रो, अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, एल अॅण्ड टी, ल्युपिन, इन्फोसिस, सन फार्मा, सिप्ला, टाटा स्टील यांचाही क्रम राहिला. आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, ऊर्जा, पोलाद हे क्षेत्रीय निर्देशांक ०.८६ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक ०.३५ टक्क्यापर्यंत घसरले.