मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदविली असली तरी ते प्रमाण अद्यापही किरकोळ आहे. आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात ‘सेन्सेक्स’ ५४.४३ अंश वाढीसह १८,८१७.३८ वर गेला. तर २०.२० अंश वधारणेसह ‘निफ्टी’ने ५,७२० ही तांत्रिक अडथळा दूर सारला.
गेल्या चारही सत्रात मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ३३२ अंशांनी वधारला आहे. कालच्या अवघ्या ७ अंशांच्या वाढीनंतर मुंबई निर्देशांक सकाळच्या सत्रात १८७४० पर्यंत पोहोचला होता. यानंतर दिवसभरात तो १८,८२९ पर्यंत गेला. दिवसअखेर मात्र तो १८,८०० वर कायम राहिला. बाजारात बँक, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. प्रमुख ३० पैकी १७ समभाग वधारले होते. ऐन सण-समारंभाच्या तोंडावर बँकसारख्या समभागांमधील गुंतवणूकदारांची खरेदी वाढली आहे. यामध्ये स्टेट बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक यांचा समावेश होता.    

Story img Loader