गेल्या आठ सत्रातील ‘सेन्सेक्स’मधील सलग घसरणीचा क्रम अखेर मंगळवारी थांबला. चिंताजनक औद्योगिक उत्पादन तसेच किरकोळ महागाई दर जाहीर होऊनही ‘सेन्सेक्स’मध्ये १०० अंशांची भर पडली. इंधन विपणन कंपन्यांना सरकारने रोख अनुदान जाहीर केल्याने भांडवली बाजारातील या कंपन्यांच्या समभागांच्या झालेल्या जोमदार खरेदीने निर्देशांक पुन्हा १९,५०० च्या वर गेला.
मंगळवारी दिवसभरात झालेल्या व्यवहारात खरेदीचा प्रभाव राहिल्याने दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ १००.४७ अंशांने वधारून १९,५६१.०४ वर पोहोचला. तर २४.६५ अंश वाढीसह ‘निफ्टी’ने त्याचा ५,९०० वर म्हणजे ५,९२२.५० अंशांवर विश्राम घेतला.
सलग आठ सत्रात मिळून मुंबई निर्देशांकाने ५४४ अंशांचे नुकसान सोसले होते. असे करताना शेअर बाजार १९,५०० च्याही खाली आला होता. दीर्घ कालावधीसाठी सलग घसरणीचा क्रम यापूर्वी मे २०११ मध्ये राखला गेला होता. देशाच्या विकास दराबाबतची चिंता यातून स्पष्ट होत गेली होती.
सलग तिसऱ्या महिन्यात, डिसेंबरमध्येही नकारात्मक औद्योगिक उत्पादन वाढ तसेच किरकोळ महागाईचा दर जानेवारीमध्येही दुहेरी आकडय़ात राहूनही बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण होते. कमी दराने विक्री करणाऱ्या इंधन कंपन्यांना सुमारे २५,००० कोटी रुपयांचे रोख अनुदान जाहीर झाल्याने या क्षेत्रातील समभागांना आजच्या व्यवहारात मागणी आली. त्यामुळे एकूणच तेल व वायू निर्देशांक सर्वाधिक १.५२ टक्क्याने वधारला होता.
‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी १७ कंपनी समभाग वधारलेले राहिले. त्यातील अनेक समभाग ३.८१ टक्क्यांपर्यंतच्या वाढीचे मूल्य राखून होते. सन फार्मा, टाटा मोटर्स, कोल इंडिया, भारती एअरटेल यांचा त्यात उल्लेख करावा लागेल. तर एचडीएफसी बँक, रिलायन्स यांनाही अधिक भाव मिळाला.
यांनी रोखली घसरण..
* ओएनजीसी रु. ३२०.१५ +३.८१%
* एचपीसीएल रु. ३२६.९० +२४१%
* बीपीसीएल रु. ४१०.८० +२.११%
* आयओसी रु. ३१७.३५ +१.५२%
* रिलायन्स रु. ८७५.९५ +०.९४
तेल-वायू निर्देशांक : +१.५२%
‘सेन्सेक्स’ची मात्र वेगळी तऱ्हा
गेल्या आठ सत्रातील ‘सेन्सेक्स’मधील सलग घसरणीचा क्रम अखेर मंगळवारी थांबला. चिंताजनक औद्योगिक उत्पादन तसेच किरकोळ महागाई दर जाहीर होऊनही ‘सेन्सेक्स’मध्ये १०० अंशांची भर पडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-02-2013 at 03:24 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex is looking is different