सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकात मंगळवारी सलग पाचवी तेजी नोंदली गेली. १४७.३३ अंशवाढीसह सेन्सेक्स २६,९३२.८८ वर, तर ३३.६० अंशवाढीमुळे निफ्टी ८,१८०.९५ पर्यंत पोहोचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर कपात लांबणीवर पडण्याचे गेल्या काही सत्रांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून स्वागत होत आहे. त्याचाच परिणाम मुंबई निर्देशांकाने मंगळवारच्या तेजीच्या व्यवहारात २७,००० चा टप्पाही अनुभवला. जागतिक बाजारात मात्र संमिश्र चित्र राहिले. सेन्सेक्सने २०१५ मधील आतापर्यंतची दुसरी मोठी वाढ नोंदविल्याच्या रूपात विदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी ६५० कोटी रुपयांची खरेदी केली होती, तर गेल्या पाच व्यवहारांतील मिळून मुंबई निर्देशांकात १,३१६.०४ अंश भर पडली आहे. सेन्सेक्स आता २१ ऑगस्टनंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

दिवसअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी साधली. सोमवारप्रमाणे मंगळवारीही टाटा समूहातील टाटा मोटर्स सेन्सेक्समध्ये सर्वात वर राहिला. त्यात ५.८१ टक्के वाढ नोंदली गेली. इतर वधारत्या समभागांमध्ये आयटीसी, कोल इंडिया, सिप्ला, गेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आदी राहिले.