मुंबई : गेल्या काही सत्रांत विक्रीमुळे पडझड अनुभवलेल्या भांडवली बाजारात गुरुवारच्या व्यवहारावर तेजीवाल्यांनी मजबूत पकड मिळविल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अपेक्षेप्रमाणे अमेरिकेत ‘फेड’ने केलेली पाऊण टक्क्यांची व्याज दरवाढ, पण पुढे जाऊन तिची आक्रमकता कमी होण्याच्या संकेतांनी जगभरात सर्वत्रच भांडवली बाजारांना उत्साहदायी वातावरण निर्माण केले, ज्यातून सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी प्रत्येकी २ टक्क्यांची भरीव वाढ साधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बजाज फायनान्सच्या समभागात गुंतवणूकदारांनी केलेल्या धुवाधार खरेदीने बाजारातील तेजीवाल्यांच्या दबदब्याचा प्रत्यय दिला. वाढत्या मूल्यात्मक समभागांच्या खरेदीला जोर चढल्याचे निवड समभागांच्या मोठय़ा मूल्य उसळीतून दिसून आले. परिणामी सेन्सेक्सने १,०४१.४७ अशांची झेप घेत, दिवस सरताना ५६,८५७.७९ अंशांची पातळी गाठली. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने १,०९७.९ अंशांची मजल मारली होती आणि या उच्चांकी स्तराच्या आसपासच त्यांचा बंद स्तर राहिला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने २८७.८० अंशांची कमाई केली आणि १७,००० नजीक १६,९२९.६० या पातळीवर दिवसाला निरोप दिला.

अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीनंतर जागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत पातळीवर लार्ज कॅप कंपन्यांच्या तिमाहीतील उत्साहवर्धक कमाईने बाजारातील तेजीला लकाकी दिली. फेडरल रिझव्‍‌र्हचा पाऊण टक्के व्याज दरवाढीचा निर्णय बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे आला आहे. फेडच्या अध्यक्षांच्या समालोचनात, मंदीची शक्यता नाकारली गेली असली तरी अर्थव्यवस्थेची गती कमी होण्याचा इशारा देण्यात आला. तथापि आगामी काळात व्याज दरवाढीची आक्रमकता कमी होण्याची शक्यता असल्याने जागतिक स्तरावर गुंतवणुकीच्या भावनांना चालना मिळाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये बजाज समूहातील वित्त कंपन्यांनी जून तिमाहीत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर बजाज फायनान्सच्या समभागात सर्वाधिक १०.६८ टक्क्यांची, तर बजाज फिनसव्‍‌र्हचा समभागात १०.१४ टक्क्यांची तेजी होती.

फेडकडून पुन्हा व्याजदरात वाढ, पण..

वॉशिंग्टन : अमेरिकी मध्यवर्ती बँक-  फेडरल रिझव्‍‌र्हने सार्वत्रिक अपेक्षेप्रमाणे, महागाईला काबूत आणण्यासाठी व्याज दरवाढीचे आक्रमक धोरण स्वीकारत सलग दुसऱ्या महिन्यात व्याजदरात थेट पाऊण (०.७५ आधार िबदू) टक्क्यांची वाढ बुधवारी केली.  अमेरिकी अर्थव्यवस्था गेल्या चाळीस वर्षांतील उच्चांकी महागाईचा सामना करत आहे. परिणामी बुधवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदर २.२५ टक्के ते २.५० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. फेडने जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत व्याजदरात दीड टक्क्यांची (१५० आधार िबदू) वाढ केली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार पावले उचलली जात असून अमेरिकेतील महागाईचा दर दोन टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ‘फेड’ने स्पष्ट केले आहे.

रुपयात २२ पैशांची उसळी

मुंबई : गेल्या काही व्यवहारात खालचा प्रवास नोंदविणाऱ्या रुपयाने गुरुवार अखेर मात्र तेजीचे बळ मिळविले. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन बुधवारपेक्षा २२ पैशांनी वधारत ७९.६९ पर्यंत मजबूत बनले. दिवसभरातील सत्रात रुपयाने ७९.६४ ही उच्चांकी आणि ७९.८५ ची नीचांकी पातळी पाहिली. बुधवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी घसरून ७९.९१ वर बंद झाला होता. मंगळवार उशिरापासून दोन दिवस चालणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याज दरकपातीबाबतच्या बैठकीकडे परकी चलन व्यवहारकर्त्यांचे लक्ष लागले असतानाच अपेक्षेप्रमाणे व्याज दरवाढ करण्यात आली. परिणामी फेडच्या ०.७५ टक्क्यांच्या वाढीनंतर देशांतर्गत भांडवली बाजाराने दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे रुपयाला अधिक बळ मिळाले.