मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांची विजयी घोडदौड कायम असून शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात ‘सेन्सेक्स’ने एक टक्क्याची भर घातली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी समूहातील कंपन्या आणि इन्फोसिसच्या समभागात गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीने निर्देशांकांना तेजीचे बळ दिले. जागतिक पातळीवरदेखील सकारात्मक कल असल्याने त्याचेही पडसाद भांडवली बाजारावर उमटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आघाडीच्या ३० कंपन्यांचा समावेश असलेला निर्देशांक सेन्सेक्स ७१२.४६ अंशांनी म्हणजेच १.२५ टक्क्याने वधारून ५७,५७०.२५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात तो ७६१.४८ अंशांनी मजबूत झाला होता. सेन्सेक्सने शुक्रवारी ५७,१०४.८१ अंशांची नीचांकी तर ५७,६१९.२७ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीमध्ये २२८.६५ अंशांची (१.३५ टक्के) वाढ झाली आणि तो १७,१५८.२५ वर पोहोचला.

अमेरिकी अर्थव्यवस्थेची वाढ सलग दुसऱ्या तिमाहीत शून्याखाली आक्रसल्याच्या वृत्ताने अमेरिकी भांडवली बाजाराची कमकुवत सुरुवात झाली. मात्र फेडरल रिझव्‍‌र्हने यापुढे व्याजदरात आक्रमकपणे वाढ नसेल असे सूचित केल्यावर अमेरिकी बाजार सावरले. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. याचबरोबर रुपयादेखील अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सावरला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

रुपया ४५ पैशांनी सावरला

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारच्या सत्रात ४५ पैशांनी वधारून ७९.२४ पातळीवर बंद झाला. भांडवली बाजारात परकीय गुंतवणूकदारांनी लावलेला खरेदीचा सपाटा आणि त्या परिणामी सलग तिसऱ्या सत्रात तेजीवाल्यांचा जोर कायम असल्याने रुपयाने चांगली कामगिरी केली. स्थानिक चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७९.५५ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान रुपयाने ७९.५६ रुपयाची नीचांकी तर ७९.१७ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला.

रुपया ४५ पैशांनी सावरला

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारच्या सत्रात ४५ पैशांनी वधारून ७९.२४ पातळीवर बंद झाला. देशांतर्गत भांडवली बाजारात परकीय गुंतवणूकदारांनी लावलेला खरेदीचा सपाटा आणि त्या परिणामी सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजारात तेजीवाल्यांचा जोर कायम असल्याने रुपयाने चांगली कामगिरी केली. स्थानिक चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७९.५५ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान रुपयाने ७९.५६ रुपयाची नीचांकी तर ७९.१७ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला.