सलग पाचव्या सत्रात घसरण नोंदविणारा सेन्सेक्स मंगळवारी २७,७०० तर निफ्टी ८,४०० च्या खाली आला. २१०.१७ अंश घसरणीने मुंबई निर्देशांक २७,६७६.०४ तर ७०.३५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८,३७७.७५ वर स्थिरावला.
कंपन्यांच्या निकालाबाबतची गुंतवणूकदारांची चिंता मंगळवारीही कायम राहिली. विदेशी संस्था गुंतवणूकदारांनी सोमवारीही १,५०६.८६ कोटी रुपयांची विक्री केल्याने मुंबई निर्देशांकांत एकाच व्यवहारात तब्बल ५०० हून अधिक अंश आपटी नोंदविली गेली, तर आता केल्या पाच व्यवहारातील सेन्सेक्सची घसरण १,३७० अंश झाली आहे.
मंगळवारच्या व्यवहारात २७,९७६.९३ पर्यंत मजल मारणाऱ्या मुंबई निर्देशांकाने सत्रात २७,५९६.२१ चा तळही अनुभवला. बाजाराचा मंगळवार बंदअखेरचा स्तर हा २७ मार्चनंतरचा किमान राहिला. व्यवहारात ८,४६९.३५ ते ८,३५२.७० असा प्रवास करणाऱ्या निफ्टीने मंगळवारी ८,४०० चाही स्तर सोडला.दायइचीच्या सन फार्मामधून बाहेर पडण्याच्या शिक्कामोर्तबानंतर कंपनीचा समभाग व्यवहारात ११ टक्क्य़ांनी आपटला.
विदेशी गुंतवणूकदारांचा चिंता‘नूर’ कायम;
सलग पाचव्या सत्रात घसरण नोंदविणारा सेन्सेक्स मंगळवारी २७,७०० तर निफ्टी ८,४०० च्या खाली आला. २१०.१७ अंश घसरणीने मुंबई निर्देशांक २७,६७६.०४ तर ७०.३५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८,३७७.७५ वर स्थिरावला.
First published on: 22-04-2015 at 06:54 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex lose down on tuesday