सत्राच्या प्रारंभापासून संथ वाटचाल करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने व्यवहाराच्या अगदी शेवटच्या अध्र्या तासात झेप घेतल्याने ‘सेन्सेक्स’ गेल्या दोन आठवडय़ाच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचू शकला. १३४.६४ अंश वाढीसह बाजार १९,६३५.७२ वर गेला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ४१.५० अंश वाढीसह ५,९,३९.७० पर्यंत पोहोचला.
भांडवली बाजाराचे आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्राचे सुरुवातीचे व्यवहार काहीसे सावध सुरू झाले. १९,५०० च्या वरच सुरू झालेला ‘सेन्सेक्स’ दुपारपूर्वी १९,४५० पर्यंत पुन्हा येऊन ठेपला होता. लगेचच तो पुन्हा १९,५०० च्या वर जात थेट १९,६७१ या दिवसाच्या उच्चांकापर्यंत पोहोचल्यानंतर दिवसअखेर १९,६६० च्या वर राहिला.
ओएनजीसी, इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय बँक अशा आघाडीच्या समभागांची जोरदार खरेदी बाजारात झाली. हे समभाग ४.०३ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदवित होते. अगदी शेवटच्या अध्र्या तासात झेप घेणाऱ्या ‘सेन्सेक्स’ने लगेचच पंधरवडय़ापूर्वीचा टप्पा गाठला. ६ फेब्रुवारी मुंबई निर्देशांक समकक्ष, १९,६०० च्या वरच होता. बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रीय निर्देशांक तेजीत होते.

Story img Loader