दहा दिवसांवर आलेल्या अर्थसंकल्पात अर्थसुधारणा तर पुढील महिन्यात रिझव्र्ह बँकेकडून होणारी संभाव्य व्याजदर कपात या जोरावर भांडवली बाजाराचा प्रवास बुधवारीदेखील तेजीतच राहिला. १८४.३८ अंश वाढीसह सेन्सेक्स २९,३२०.२६ या तीन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. ५९.७५ अंश वाढीसह निफ्टी ८,८६९.१० पर्यंत गेला.
सत्रात सेन्सेक्स २९,१२६.९१ ते २९,४११.३२ पर्यंत राहिला. गेल्या सलग सहा व्यवहारात मुंबई निर्देशांकाची झेप ३.८७ टक्के म्हणजेच १,०९२.८४ अंश राहिली आहे. तर निफ्टीचा बुधवारचा प्रवास व्यवहारात ८,८९४.३० पर्यंत झेपावला होता. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप हे निर्देशांक अनुक्रमे जवळपास एक टक्क्याने वाढले. सेन्सेक्स आता २९ जानेवारीच्या २९,६८१.७७ नजीक आहे.
सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकाना सलग सहाव्या दिवशी चढ
दहा दिवसांवर आलेल्या अर्थसंकल्पात अर्थसुधारणा तर पुढील महिन्यात रिझव्र्ह बँकेकडून होणारी संभाव्य व्याजदर कपात या जोरावर भांडवली बाजाराचा प्रवास बुधवारीदेखील तेजीतच राहिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-02-2015 at 03:41 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty hit over two week high