५८ हजारांची पातळीही पुन्हा काबीज

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

मुंबई : रशिया-युक्रेनमधील तणाव कमी होत असल्याचे सुचिन्ह दिसत असल्याने जगभरातील भांडवली बाजारात तेजीची लाट निर्माण झाली. युक्रेन सीमेजवळ तैनात रशियन सैन्य त्यांच्या तळांवर परतत असल्याच्या वृत्तानंतर, विशेषत: मध्यान्हानंतर युरोपीय बाजारांतील उत्साही सुरुवात पाहता, स्थानिक बाजारातही खरेदीला जोर चढला.

परिणामी सोमवारच्या सत्रात गेल्या दहा महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदविलेला ‘सेन्सेक्स’ १,७०० अंशांनी फेरउसळी घेत पुन्हा ५८,००० पातळीवर परतला. निफ्टीनेदेखील मंगळवारच्या सत्रात १७,००० अंशांची पातळी पुन्हा गाठली.

वाहननिर्मिती, बँक, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचा निर्देशांक वधारल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांना बळ मिळाले. सेन्सेक्स १,७३६.२१ अंशांनी वधारून ५८,१४२.०५ पातळीवर बंद झाला. तर निफ्टीने ५०९.६५ अंशांची कमाई केली. तो दिवसअखेर १७,३५२.४५ पातळीवर स्थिरावला.

रशिया-युक्रेनमधील तणाव कमी होत असून त्याचे प्रतिबिंब जागतिक स्तरावर उमटले. प्रमुख देशांच्या भांडवली बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारात निर्देशांकांनी ३ टक्क्यांहून अधिक तेजी दर्शविली. याचबरोबर खनिज तेलाच्या दरात घसरण झाल्याने ब्तेजीला अधिक बळ मिळाले. किरकोळ  महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील पातळीच्या वर पोहोचत तो जानेवारीत ६.०१ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचल्याने नजीकच्या काळात देशांतर्गत बाजारासाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियलचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदले.

रुपयाला २९ पैशांचे बळ

चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारच्या सत्रात दमदार कामगिरी केली. भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांनी दर्शविलेली तीन टक्क्यांची तेजी आणि प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्याने रुपया वधारला. तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात समभागांची खरेदी वाढवल्याने रुपयाला बळ मिळाले. डॉलरसमोर रुपया २९ पैशांनी वधारून ७५.३१ पैसे प्रति डॉलर पातळीवर स्थिरावला. बाजार उघडताच रुपयाचे मूल्य घसरले होते. रुपयाने दिवसभरातील सत्रात ७५.३१ रुपयांची उच्चांकी तर ७५.७२ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती.