प्रमुख भांडवली बाजारातील घसरण सलग पाचव्या दिवशी कायम राहताना मुंबई निर्देशांक मंगळवारी गेल्या तीन आठवडय़ाच्या तळात विसावला. कमकुवत आशियाई बाजाराच्या जोरावर येथेही नफेखोरी होत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला ९४.०६ अंश घसरणीसह २०,६१२.१४ वर आणून ठेवले.
मुंबई शेअर बाजार यापूर्वी १७ डिसेंबर रोजी या किमान पातळीवर होता. बाजारात मंगळवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांसह पोलादनिर्मिती क्षेत्रातील समभागांचे मूल्य रोडावले. ८ क्षेत्रीय निर्देशांक घसरणीत होते. दुपारपूर्वी काहीसा सावरलेला शेअर बाजार व्यवहाराच्या शेवटच्या अध्र्या तासात पुन्हा तेजीने घसरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा