व्यवहाराच्या सुरुवातीलाच २१ हजारापुढे जात त्याने लगेचच २१,४८३ हा सर्वोच्च स्तर गाठला. यावेळी ४८७ अंशांची वाढ नोंदली गेली. दिवसअखेरही सेन्सेक्स ३३० अंशांच्या वाढीने अखेर करत २१,३२६ या नव्या उच्चांकावर स्थिरावला. सेन्सेक्सने ३ नोव्हेंबरचा वरचा टप्पा यावेळी खाली खेचला.
राष्ट्रीय शेअर बाजारानेही सोमवारी ६,४१५ पर्यंत झेप घेत दिवसअखेर १०४ अंश वाढीने ६,३६४ केली. निफ्टीने मात्र २००८ (६,३५७) नंतर गेल्या महिन्यात पाहिलेली सर्वोच्च पातळी सोमवारच्या रुपात पुन्हा अनुभवली. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी दीड टक्क्य़ांहून अधिक वाढ नोंदविली.
पाच राज्यातील मतदानोत्तर चाचणीमध्येही जनतेचा कौल भाजपालाच मिळाल्याने शुक्रवारीदेखील शेअर बाजार २५० अंशांने हर्षोल्हास करता झाला होता.
१० पैकी निम्मे समभाग वधारले होते. तर ९९ समभागांनी त्यांचा वर्षांतील उच्चांक गाठला. यामध्ये अॅक्सिस बँक, बायोकॉन यांचा समावेश होता. (याचबरोबर १०५ समभाग वर्षांच्या तळालाही आले.) १३ पैकी १२ क्षेत्रीय निर्देशांक तेजीत नोंदले गेले. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपनी समभागांचे मूल्य उंचावले. सोमवारच्या सेन्सेक्सच्या नव्या उंच्चांकाने गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच व्यवहारात ७५ हजार कोटी रुपयांनी उंचावली.
भांडवली बाजारातील ही तेजी पाहून आणि विदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा ओढा लक्षात घेता येत्या वर्षांत केंद्रात येणारे नवे सरकार अर्थविकासाला चालना देणारे, उद्योगजगताच्या हिताचे निर्णय घेणारे असेल, या अंदाजावर बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्चसह अनेक मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी आगामी पथप्रवास आशादायक वर्तविला.
२०१३ संपण्यास काही दिवसांचाच कालावधी असताना आता डिसेंबरअखेर सेन्सेक्स २२ हजार तर निफ्टी ७ हजाराचा टप्पा गाठेल, असेही आता म्हटले जात आहे. उद्योग संघटनांकडूनही आता अर्थविकासाचीच अधिक अपेक्षा केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा