सलग तिसऱ्या सत्रात वधारणाऱ्या सेन्सेक्सने दोन आठवडय़ाच्या उच्चांकांपर्यंत मजल मारत मंगळवारी २५,५००पुढे मजल मारली. सेन्सेक्स १०२.५७ अंशांनी वधारत २५,५१६.३५ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३.३५ अंश वाढीसह ७,६३४.७० वर पोहोचला. सोमवारी उशिरा जाहीर झालेल्या मेमधील निर्मिती क्षेत्रातील वाढ व मंगळवारच्या जूनच्या वाढीव वाहन विक्रीच्या जोरावर बाजार दिवसभर तेजीच्या हिंदोळ्यावर राहिला. अनुदान भार कमी करणारा गॅस दरवाढीसारख्या कठोर निर्णयाचेही बाजारात स्वागतच झाले. परिणामी वाहन, पोलाद, भांडवली वस्तू, बांधकाम क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. वाढलेल्या विक्रीमुळे मारुती, महिंद्रसारख्या कंपन्यांचे समभाग मूल्य उंचावले. तर डॉलरचा उतरल्याने माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मंगळवारी एकूण निर्देशांक वधारणेतही घसरण राखावी लागली.
ल्ल भांडवली बाजारातील तेजीला साथ चलन बाजारातील व्यवहाराने मंगळवारी उठावदार कामगिरी केली. डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी १० पैशांनी उंचावला. गेल्या १० दिवसांतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी राहिली. चलन दिवसअखेर ६०.०७ वर स्थिरावले. अनुदानावरील भार कमी करण्यासाठी सरकारने इंधनाच्या किमतींमध्ये केलेल्या वाढीमुळे रुपया भक्कम झाल्याचे मानले जाते. चलन यापूर्वी १९ जून रोजी ३१ पैशांनी वधारले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा