सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन आणि महागाई दराच्या प्रतिक्षेत दिवसभर अस्थिर राहिलेला प्रमुख भांडवली बाजार बुधवारअखेर काहीसा सावरला. २९.८० अंश वाढीसह सेन्सेक्स २१,८५६.२२ वर बंद झाला. निफ्टी ५ टक्के वधारणेसह ६,५१६.९० वर पोहोचला. जानेवारीतील औद्योगिक उत्पादन दराचे वधारलेले व फेब्रुवारीतील किरकोळ महागाईचे घसरणारे आकडे सायंकाळी जाहिर झाले. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात दिवसभर अस्थिरतेची नोंद करणारा सेन्सेक्स सत्रअखेर औषधनिर्मिती, ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांच्या मागणीने वधारला. सेन्सेक्सने दोन दिवसांच्या उच्चांकासह सलग पाच सत्रातील वाढ बुधवारी किरकोळ घसरणीसह मोडून काढली होती. दरम्यान, परकी चलन व्यवहारात सलग दुसऱ्या दिवशी भारतीय चनल नरम बनताना २८ पैशांनी घसरत ६१.२२ पर्यंत घसरले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2014 रोजी प्रकाशित
अस्थिरतेतून सावरत ‘सेन्सेक्स’ची सकारात्मक अखेर
सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन आणि महागाई दराच्या प्रतिक्षेत दिवसभर अस्थिर राहिलेला प्रमुख भांडवली बाजार बुधवारअखेर काहीसा सावरला.
First published on: 13-03-2014 at 04:48 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex positive end