चालू आठवडय़ाची अखेर करताना भांडवली बाजाराने अखेर घसरणच नोंदविली. बुधवारच्या घसरणीनंतर गुरुवारी बाजारात तेजी नोंदली गेली होती. यामुळे सेन्सेक्स २८ हजारानजीक तर निफ्टी ८,४०० पर्यंत पोहोचला होता. मुंबई निर्देशांक ८४.१३ अंश घसरणीसह २७,८११.८४ वर; १६.९० अंश घसरणीसह निफ्टी ८,३८१.१० वर बंद झाला.
वाढत्या बुडित कर्जाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने तिच्या अहवालात चिंता व्यक्त केल्यानंतर बाजारात अर्थातच बँक समभागांवर विक्रीचा अधिक दबाव दिसून आला. मध्यवर्ती बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालात बँकांची स्थिती मार्च २०१६ पर्यंत कायम राहण्याविषयीचे वक्तव्य होते.
सप्ताहअखेरच्या व्यवहारात सेन्सेक्स २७,९२१.८६ तर निफ्टी ८,४०८.५५ पर्यंत पोहोचू शकला. २८ हजार गाठण्यात सेन्सेक्सला अपयश आले असले तरी निफ्टीने त्याचा ८,४०० चा टप्पा सत्रात गाठलाच.
दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सलग दुसरी साप्ताहिक वाढ यंदा नोंदविली आहे. या कालावधीत सेन्सेक्स ४९५.६७ तर निफ्टी १५६.१५ अंशांनी वाढला.
बँक निर्देशांक :
२१,०५८.७६ (-०.७४%)
बँक ऑफ इंडिया :
रु. १७७.०० (-३.२०%)
कोटक महिंद्र बँक :
रु. १,३८३.२० (-१.५६%)
पंजाब नॅशनल बँक :
रु. १३६.१० (-१.५६%)
कॅनरा बँक :
रु. २८९.८० (-१.४०%)
आयसीआयसीआय बँक :
रु. ३११.२५ (-१.३५%)
फेडरल बँक :
रु. १४७.४५ (-१.३१%)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा