भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची निराशाजनक कामगिरी सलग पाचव्या व्यवहारात कायम राहिली आहे. किरकोळ निर्देशांक घसरणीने प्रमुख भांडवली बाजार गेल्या पंधरवडय़ाच्या नव्या तळात विसावले आहेत.
३२.१४ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,८५०.९७ पर्यंत आला. तर १२ अंश नुकसानासह निफ्टी ८,७११.७० वर स्थिरावला. बाजारांची ही २० जानेवारीनंतरची किमान पातळी आहे.
गेल्या पाचही सत्रात प्रमुख निर्देशांकांची नकारात्मक कामगिरी राहिली आहे. या कालावधीतील सेन्सेक्सची घसरण तर ८३०.८० अंशांची राहिली आहे. सेन्सेक्सचा यापूर्वीचा किमान स्तर २८,७८४.६७ अंश होता.
गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात सेन्सेक्सने तेजीसह केली. जवळपास ४०० अंश वाढीने मुंबई निर्देशांक सत्रात २९ हजाराच्या वर गेला होता. मात्र हा क्रम त्याला सत्रअखेर कायम राखता आला नाही.
मुंबई शेअर बाजारात ऊर्जा, स्थावर मालमत्ता, ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. तर माहिती तंत्रज्ञानासारख्या डॉलरच्या भक्कमतेवर निर्भर असलेल्या निर्देशांक तसेच कंपन्यांमध्ये तेजी अनुभवली गेली.
सेन्सेक्समध्ये टाटा पॉवर, सेसा स्टरलाईट, भेल, ओएनजीसी, महिंद्र अॅन्ड महिंद्र, सिप्ला, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, गेल, हिंदाल्को यांचे समभाग मूल्य रोडावले.
सेन्सेक्समधील घसरणीमध्ये २० समभागांचा समावेश राहिला. तर वधारणाऱ्या १० समभागांमध्ये बाजारातून भांडवल उभारणी करणाऱ्या एचडीएफसी समूहातील एचडीएफसी लिमिटेड होता. त्याच्याबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, इन्फोसिस, टीसीएसही ३ टक्क्य़ांपर्यंत चमकले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा निर्देशांकाने २.८ टक्क्य़ांची आपटी अनुभवली. तर माहिती तंत्रज्ञान निर्देशांक २ टक्क्य़ांनी वधारला. स्मॉल व मिड कॅप मात्र सव्वा टक्क्य़ापेक्षा अधिक फरकाने घसरले.
आशियाई बाजारात घसरणीचेच चित्र अधिक होते. केवळ हँग सँग वगळता इतर प्रमुख निर्देशांक एक टक्क्य़ावरील घसरण नोंदवित होते. तर युरोपीय बाजारात संमिश्र वातावरण होते.
सेन्सेक्स, निफ्टीत घसरणच; निर्देशांक पंधरवडय़ाच्या नीचांकात
भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची निराशाजनक कामगिरी सलग पाचव्या व्यवहारात कायम राहिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-02-2015 at 06:29 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex rallies over 150 points