रिझव्र्ह बँकेच्या मंगळवारच्या वार्षिक पतधोरणापूर्वी जोरदार खरेदी साधण्याची प्रक्रिया गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच पार पाडली. परिणामी एकाच व्यवहारातील जवळपास अडिचशे अंश वाढीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८,५०० पुढे गेला. तर पाऊणशे अंश भर पडून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६०० च्या वर होता. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्समध्ये २४४.३२ भर पडत मुंबई निर्देशांक २८,५०४.४६ वर तर निफ्टी ७३.६५ अंश वाढीसह ८,६५९.९० पर्यंत पोहोचला. व्याजदराशी निगडित स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित समभाग मूल्यांमध्ये तेजी नोंदली गेली.
गुंतवणूकदारांची नजरही रिझर्व्ह बँकेवर
रिझव्र्ह बँकेच्या मंगळवारच्या वार्षिक पतधोरणापूर्वी जोरदार खरेदी साधण्याची प्रक्रिया गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच पार पाडली.
First published on: 07-04-2015 at 07:32 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex rangebound after rallying over 100 points nifty tests 8600 12 stocks in focus