गेल्या सलग तीन सत्रांपासून सर्वोच्च टप्प्यापासून दूर जाणाऱ्या भांडवली बाजारांनी गुरुवारी अखेर तेजी नोंदविली. सेन्सेक्समध्ये शतकी वाढ नोंदली गेली तर निफ्टीने व्यवहारात नव्या ऐतिहासिक टप्प्याला स्पर्श केला. दिवसअखेर १२०.११ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २८,५६२.८२ वर बंद झाला. तर निफ्टी २६.७५ अंश वधारणेने ८,५६४.४० पर्यंत पोहोचला.
ऐतिहासिक स्तरापासून गेल्या तीन दिवसांच्या व्यवहारात २५१.२८ अंशांनी मागे राहिलेला सेन्सेक्स गुरुवारी सुरुवातीपासूनच वधारणेत होता. व्यवहारात तो २८,८०८.७८ पर्यंत उंचावला.
निफ्टीने सत्रातील ८,६२६.९५ ही झेप स्थापनेतील सर्वोच्च नोंदविली. दिवसअखेर तो या टप्प्यापासून दुरावला असला तरी त्यातही वाढ नोंदली गेली. निफ्टीचा यापूर्वीचा विक्रम १ डिसेंबरचा ८,६२३ हा होता.
सेन्सेक्समधील सेसा स्टरलाइट, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, अॅक्सिक बँक, एचडीएफसी लि, बजाज ऑटो यांना मागणी राहिली. एकूण बँक निर्देशांक ०.७६ टक्क्यांनी वधारला.
तर स्मॉल व मिड कॅपही अनुक्रमे ०.३१ व ०.२५ टक्क्यांनी उंचावले. मंदीच्या सावटात असलेल्या युरोपातील मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणावर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी व्यवहार केले.
सिगारेट समभाग सावरले
सुटय़ा सिगारेटवरील र्निबध तूर्त लागू न करण्याच्या सरकारच्या हालचालींनी सिगारेट उत्पादक कंपन्यांना दिलासा दिला. गुरुवारच्या व्यवहारात बाजारात सूचिबद्ध सिगारेट कंपन्यांचे समभाग मूल्य उंचावले.१०.४ टक्के वाढीसह आयटीसी व्यवहारात सहा महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचला, तर गॉडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी इंडस्ट्रीजचे समभागही सत्रात अनुक्रमे १०.३ ते ६.५ टक्क्यांनी उंचावले होते.
२५% सार्वजनिक भागभांडवलाच्या दंडकाचे पालन न करणाऱ्या १०० हून अधिक कंपन्या
‘सेबी’कडून कारवाई