गेल्या सलग तीन सत्रांपासून सर्वोच्च टप्प्यापासून दूर जाणाऱ्या भांडवली बाजारांनी गुरुवारी अखेर तेजी नोंदविली. सेन्सेक्समध्ये शतकी वाढ नोंदली गेली तर निफ्टीने व्यवहारात नव्या ऐतिहासिक टप्प्याला स्पर्श केला. दिवसअखेर १२०.११ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २८,५६२.८२ वर बंद झाला. तर निफ्टी २६.७५ अंश वधारणेने ८,५६४.४० पर्यंत पोहोचला.
ऐतिहासिक स्तरापासून गेल्या तीन दिवसांच्या व्यवहारात २५१.२८ अंशांनी मागे राहिलेला सेन्सेक्स गुरुवारी सुरुवा
निफ्टीने सत्रातील ८,६२६.९५ ही झेप स्थापनेतील सर्वोच्च नोंदविली. दिवसअखेर तो या टप्प्यापासून दुरावला असला तरी त्यातही वाढ नोंदली गेली. निफ्टीचा यापूर्वीचा विक्रम १ डिसेंबरचा ८,६२३ हा होता.
सेन्सेक्समधील सेसा स्टरलाइट, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, अॅक्सिक बँक, एचडीएफसी लि, बजाज ऑटो यांना मागणी राहिली. एकूण बँक निर्देशांक ०.७६ टक्क्यांनी वधारला.
तर स्मॉल व मिड कॅपही अनुक्रमे ०.३१ व ०.२५ टक्क्यांनी उंचावले. मंदीच्या सावटात असलेल्या युरोपातील मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणावर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी व्यवहार केले.
सिगारेट समभाग सावरले
सुटय़ा सिगारेटवरील र्निबध तूर्त लागू न करण्याच्या सरकारच्या हालचालींनी सिगारेट उत्पादक कंपन्यांना दिलासा दिला. गुरुवारच्या व्यवहारात बाजारात सूचिबद्ध सिगारेट कंपन्यांचे समभाग मूल्य उंचावले.१०.४ टक्के वाढीसह आयटीसी व्यवहारात सहा महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचला, तर गॉडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी इंडस्ट्रीजचे समभागही सत्रात अनुक्रमे १०.३ ते ६.५ टक्क्यांनी उंचावले होते.
तीन सत्रांतील घसरण थांबली
गेल्या सलग तीन सत्रांपासून सर्वोच्च टप्प्यापासून दूर जाणाऱ्या भांडवली बाजारांनी गुरुवारी अखेर तेजी नोंदविली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-12-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex rises 120 pts nifty hits new peak itc in limelight