दिवाळीपूर्वीच २१ हजाराला जाऊन येणारा सेन्सेक्स पाहून त्याच्या नव्या उच्चांकाचे वेध आता साऱ्यांनाच लागले आहेत. जर्मनीच्या डॉएच्च बँकेनेही भारतीय भांडवली बाजाराबाबतचा आशावाद पूर्वीच्या २१ हजारावरून आता थेट २२ हजारांवर नेऊन ठेवला आहे. बँकेच्या अंदाजानुसार, डिसेंबर २०१३ अखेर सेन्सेक्स २२ हजापर्यंत पोहोचू शकतो. बँकेने यापूर्वी डिसेंबपर्यंत मुंबई निर्देशांक २१ हजारापर्यंत पोहोचेल, असे म्हटले होते. यंदाच्या चांगल्या मान्सूनच्या जोरावर बँकेने हा आशावाद उंचावला आहे. अर्थव्यवस्थेतून आता नकारात्मक वृत्त येण्याचा कालावधी संपला असून गुंतवणूकपूरक वातावरणही दृष्टिपथात आहे, असेही बँकेने म्हटले आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात ५६ टक्के तर खर्चात ६४ टक्के हिस्सा राखणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेने यंदाच्या कालावधीत गेल्या १५ महिन्यातील सर्वोत्तम मान्सून अनुभवला आहे, असेही निरिक्षण बँकेने नोंदविले आहे. सेन्सेक्सने व्यवहारात २१ हजाराचा (२१,०३९.४२) टप्पा याच आठवडय़ात, गुरुवारी गाठला. तर बंद होतानाचा त्याचा १ जानेवारी २००८ रोजीचा २१,२०६.७७ हा ऐतिहासिक टप्पा अद्याप पुन्हा स्पर्शिला गेलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा