अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या संभाव्य व्याजदर वाढीच्या गेले काही दिवस सुरू असलेल्या चिंतेतून डोके वर काढत भांडवली बाजाराने मंगळवारी किरकोळ तेजी नोंदविली. कंपन्यांच्या तिमाही निकालांना प्रतिसाद देत सेन्सेक्ससह निफ्टी पुन्हा एकदा उंचावले. ७५.११ अंश वाढीसह सेन्सेक्स २५,३०५.४७ वर, तर १७.८० अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,७४८.८५ पर्यंत पोहोचला.
मुंबई निर्देशांकाने गेल्या सलग चार व्यवहारांत तब्ल ५४९ अंशांची आपटी नोंदविली आहे. अमेरिकी फेडरल रिझव्र्हमार्फत येत्या महिन्यांत होणाऱ्या व्याजदर वाढीबाबतचे संकेत तसेच सेबीचे पी-नोट्सवरील र्निबध यामुळे बाजारात गेल्या काही सत्रांत घसरणीचा क्रम राहिला होता.
मंगळवारी मात्र टाटा पॉवर, नॅशनल फर्टिलायझर्स यांच्या तिमाही नफ्यातील वाढीच्या जोरावर बाजारातही उत्साह निर्माण झाला. (दोन्ही कंपन्यांचे समभागही व्यवहारअखेर ३ टक्क्यांपर्यंत वाढले.) आशिया तसेच युरोप बाजारातील तेजीचे पडसादही येथे होतेच.
सेन्सेक्समधील १६ समभाग वाढले. यामध्ये एनटीपीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लिमिटेड हे आघाडीवर होते. तर वाहन, बँक हे क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या यादीत होते. तेल व वायू तसेच आरोग्यनिगा निर्देशांकात एक टक्क्यापर्यंतची घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये मात्र नुकसान झाले.
ज्युबिलन्ट फूडवर्क्स, ब्रिटानियामध्ये घसरणचिंता
ब्रेड, पाव उत्पादनांमध्ये कर्करोगाला निमित्त ठरणाऱ्या रासायनिक पदार्थाचे घटक सापडल्याच्या घटनेनंतर बाजारात सूचिबद्ध ज्युबिलन्ट फूडवर्क्स आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या समभागांचे मूल्य मंगळवारी ४.५ टक्क्यांपर्यंत घसरले. दोन्ही कंपन्यांच्या ब्रेड या खाद्य उत्पादनांमध्ये नवी दिल्लीत घातक रासायनिक पदार्थ सापडल्याचे ‘सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्मेट’ने म्हटले आहे. यानंतर दोन्ही कंपन्यांच्या समभागांवर त्याचा विपरीत परिणाम झाला.
० ज्युबिलन्ट फूडवर्क्स रु. १,०६३.०० ३ ४.४५%)
० ब्रिटानिया इंडस्ट्रीज रु. २,६५२.५५ ३ १.०६%)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा