तेजीसह प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या आर्थिक विकासाच्या आकडय़ावर खूश होत गुंतवणूकदारांनी बुधवारी सेन्सेक्सला त्याच्या गेल्या तीन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर नेऊन ठेवले. एकाच व्यवहारातील २५९.६५ अंश वाढीमुळे मुंबई निर्देशांक दिवसअखेर २५,८५०.३० वर पोहोचला. तर ७९.८५ अंश भर घातल्यामुळे निफ्टीला त्याचा ७,८०० चा टप्पा ७,८६५.९५ पर्यंत नेता आला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी एक टक्क्याहून अधिक वाढ नोंदविली. अमेरिकेचे २०१५ मधील तिसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे तेजीचे नोंदले गेले. त्याचबरोबर भारताच्या चालू खात्यावरील तुटीचे प्रमाणही कमी झाल्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी बुधवारी खरेदीचा सपाटा लावला. डॉलरच्या तुलनेत रुपया सलग सातव्या व्यवहारात उंचावल्याचेही बाजारात स्वागत झाले.

Story img Loader