नव्या वर्षांत अमेरिकेतील सकारात्मक घडामोडींनी शेअर बाजारात निर्माण केलेले चैतन्य कायम असून, सलग चौथ्या दिवशी वाढीचा क्रम ‘सेन्सेक्स’ शुक्रवारीही कायम ठेवला. १९.३० अंशांच्या वाढीसह सप्ताहअखेर सेन्सेक्स १९,७८४ वर स्थिरावला तर निफ्टीने ६००० पल्याड मुसंडी राखून ठेवताना ६,०१६.१५ अंशांवर विश्राम घेतला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने अमेरिकेतील सध्याच्या सरकारच्या आर्थिक उपाययोजनांच्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करणारे केलेले प्रतिपादनाचे आज जगभरच्या भांडवली बाजारात विपरित पडसाद उमटले. आशियाई बाजारातही नरमाई दिसून आली. परंतु प्रारंभीच्या घसरणीला फाटा देत आपल्या बाजाराने दिवसअखेर कालच्या तुलनेत कमाई करणारी सकारात्मकता दाखविली. डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त करण्याबाबत सरकारी पातळीवर सुरू असलेल्या हालचालीच्या वार्तेने बाजारातील कुंद वातावरण शेवटच्या सत्रात पालटलेले दिसून आले.

Story img Loader