तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..
गेल्या आठवडय़ात सूचित केलेला निर्देशांकावरील घातक उतार या आठवडय़ात आपण अनुभवत आहोत. त्यातच या तिमाहीत एप्रिल ते जूनमध्ये निर्देशांकांनी दिलेल्या ५.५ टक्क्य़ांच्या परताव्याच्या पाश्र्वभूमीवर या काळात शिफारस केलेल्या समभागाचा परतावा व आढावा घेणे श्रेयस्कर ठरेल.
या तिमाहीत निफ्टीची वाटचाल ३ एप्रिलच्या ९,२०० पातळीवरून ३० जून रोजी ९,५२०. निर्देशांकाचा सार्वकालिक उच्चांक – ६ जून रोजी ९,७०९ होता.
समभाग जेव्हा सामान्य मार्गक्रमण पट्टय़ाला (बॅन्डला) सकारात्मक वरचा छेद (अप ब्रेक आऊट) हा उलाढालीच्या (व्हॉल्युम) पाठबळावर मिळाल्यावर इच्छित उद्दिष्ट (टारगेट) साध्य होतं ते वरील समभागानी दाखवून दिलं. गणेश हाऊसिंग, त्रिवेणी इंजिनियरींग, सेल, अंनतराज इंडस्ट्री, पेन्नार इंडस्ट्री व ग्रेविटा हे समभाग अजूनही सामान्य मार्गक्रमण पट्टय़ात आहेत. जेव्हा या समभागांना उलाढालीच्या आधारावर सकारात्मक वरचा छेद मिळाल्यावर खरेदी करावेत.
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आशीष अरिवद ठाकूर – ashishthakur1966@gmail.com