रशिया-युक्रेन संकट अधिक गडद झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील वातावरण खराब झाले आहे. आशिया, युरोपपासून रशियापर्यंतच्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सिंगापूर एक्सचेंज लिमिटेडमध्ये निफ्टी १७५ अंकांनी घसरला आहे. तर डाऊ फ्युचर्स सुद्धा ५०० अंकांच्या आसपास खाली आहे. दरम्यान, युक्रेन-रशिया यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सध्या, निफ्टी २३४.१० अंकासह १६,९७२.५५ च्या पातळीच्या आसपास दिसत आहे. त्याच वेळी, सेन्सेक्स १००१.६१ टक्क्यांनी घसरून ५६,६८१.९८ च्या पातळीवर आहे.

रशियाने दोन फुटीरतावादी प्रांतांना मान्यता दिली आहे. त्याचवेळी रशियाकडून युक्रेनवर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. या कीय तणावामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजारात निफ्टीवरील आयटी निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला आहे, तर बँक आणि वित्तीय निर्देशांक १ ते १.५ टक्क्यांनी घसरला आहे. ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरूण खाली आले आहेत. सध्या सेन्सेक्समध्ये १०१६ अंकांची घसरण असून तो ५६,६६६.८९ च्या पातळीवर आहे. तर निफ्टी २८७ अंकांची घसरण करून १६९२० च्या पातळीवर आहे. दरम्यान, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ५ लाख कोटींहून अधिक खाली आले आहे.

rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

बाजार उघडल्यानंतर सुमारे २५४ शेअर्स वधारले, १९३२ शेअर्स घसरले आणि ४८ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.. दरम्यान, सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. डॉ रेड्डीज लॅब्स, एल अँड टी, एशियन पेंट्स, टीसीएस आणि यूपीएल हे निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात होते, तर ओएनजीसी नफा मिळवणाऱ्यांमध्ये होते. सोमवारी, सेन्सेक्स १४९ अंकांनी घसरून ५७,६८३ वर बंद झाला, तर निफ्टी देखील ७० अंकांनी घसरून १७,२०६ वर बंद झाला होता.

आशियातील बाजारात, जपानचे निक्केई आणि हाँगकाँगचे हँग सेंग निर्देशांक प्रत्येकी दोन टक्क्यांपेक्षा जास्त खाली आले. अमेरिकेच्या फ्युचरमध्येही मोठी घसरण होण्याची चिन्हे आहेत. सिंगापूर एक्स्चेंजवर मोठी घसरणा झाली आहे.

कच्च्या तेलाची किंमत ९६ डॉलरच्या वर

शेअर बाजारातील घसरण सुरू असतानाच दुसरीकडे मंगळवारी ब्रेंट क्रूडच्या किमतीने आठ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ९६ डॉलरच्या वर गेली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक आणि लुहान्स्क या रशियन समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. त्यानंतर अमेरिकेने पूर्व युक्रेनमधील बंडखोर भागांवर आर्थिक निर्बंध जाहीर केले, ज्यांना रशियाने पुन्हा मान्यता दिली आहे.