मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात बुधवारी सलग चौथ्या सत्रात तेजीचे वातावरण राहिले. रुपयातील नीचांकी घसरण कायम असताना भांडवली बाजारात मात्र उत्साह जोरावर असून गुंतवणूकदार मूल्यवान कंपन्यांच्या समभाग खरेदीला प्राधान्य देत आहेत. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या समभागात खरेदी झाल्याने मुख्य निर्देशांकांना बळ मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १४६.५९ अंशांची कमाई करत ५९,१०७.१९ अंशांची पातळी गाठली. सत्रादरम्यान त्याने ४३९.०९ अंशांची मजल मारत ५९,३९९.६९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २५.३० अंशांची भर घातली आणि तो १७,५१२.२५ पातळीवर स्थिरावला. मागील सलग तीन सत्रांत भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तीन टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.

ब्रिटनमध्ये महागाई दर ४० वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने युरोपातील भांडवली बाजारांमधील तेजीचे चक्र थंडावल्याचे दिसून आले. दुसरीकडे अमेरिकी भांडवली बाजारात मात्र कंपन्यांच्या समाधानकारक आर्थिक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या घटनांचे संमिश्र पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. युरोपीय बाजारातील नरमाईने उत्तरार्धात स्थानिक बाजारात नफावसुलीला जोर चढलेला दिसून आला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये एचडीएफसीचा समभाग २.१३ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. त्या पाठोपाठ नेस्ले १.९१ टक्क्यांनी, रिलायन्स इंडस्ट्रीज १.८८ टक्क्यांनी, आयटीसी १.७९ टक्क्यांनी, एचडीएफसी बँक १.०२ टक्क्यांनी आणि अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग ०.८९ टक्क्यांनी वधारला. तर एनटीपीसी, स्टेट बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, एचसीएल टेक, डॉ रेड्डीज, इन्फोसिस आणि मारुतीच्या समभागात घसरण झाली. मंगळवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी १५३.४० कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले.

नेस्लेकडून १२० रुपये लाभांश

ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील अग्रणी नेस्लेने दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी १२० रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला. हा लाभांश १६ नोव्हेंबर २०२२ रोजी दिला जाणार आहे. या माध्यमातून सर्व भागधारकांना एकूण १,१५७ कोटी रुपयांचा लाभांश मिळणार आहे. यापूर्वी ६ मे २०२२ ला कंपनीने प्रति समभाग २५ रुपये लाभांश जाहीर केला होता. कंपनीने सरलेल्या तिमाहीत ८.३ टक्के वाढीसह ६६८ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.