मनोरंजन, खेळ आणि आता उत्सवप्रिय भारतीयांचे मर्म असलेल्या सुवर्ण आभूषणांच्या व्यवसायात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी ‘सतयुग गोल्ड’ या नावाने एकाच वेळी मुंबई, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, पुणे, चंडिगढ आणि लुधियाना अशा प्रमुख शहरांत सात दालने सुरू करून प्रवेश केला आहे. या दालनांमध्ये स्वत: शिल्पाच्या १२ रचना असलेल्या सोन्याच्या आभूषणांची श्रेणी असेल. बुधवारी या कंपनीने मुंबईस्थित ‘इंडियन बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)’शी पंचवार्षिक भागीदारीचा करार करीत ‘सतयुग सोने खरेदी योजना’ही दाखल केली आहे, ज्यायोगे २४ कॅरेट शुद्धतेचे सोने प्रचलित बाजार किमतीपेक्षा ३७% स्वस्त दराने उपलब्ध केले जाण्याचाही दावा शिल्पाने केला आहे.
छायाचित्र: बुधवारी झवेरी बाजार येथील सामंजस्य कराराप्रसंगीच्या छायाचित्रात सतयुग गोल्डचे मुख्याधिकारी राज कुंद्रा, अघ्यक्षा शिल्पा शेट्टी आणि ‘आयबीजेए’चे अध्यक्ष मोहित कम्बोज.

Story img Loader