* मुंबईत कार्यरत सहकार क्षेत्रातील जनकल्याण बँकेने अलीकडेच ४० व्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्त बँकेच्या मुख्यालयात http://www.jksbl.com या नवरचित संकेतस्थळाचे उद्घाटन अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या हस्ते झाले. तसेच यानिमित्ताने बँकेने आधारकार्ड संलग्न खाते उघडण्याची सुविधा आपल्या शाखांद्वारे उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली. आधारकार्डधारकांना त्यांच्या बँक खात्यात विविध प्रकारच्या शासकीय अनुदानांचे लाभ दिले जाणार आहेत. ४० वर्षांतील पदार्पणानिमित्त बँक नव्या शैक्षणिक वर्षांत पालक-विद्यार्थी यांना उपयुक्त ठरणारी नवीन योजना लवकरच कार्यान्वित करेल, अशी माहिती वझे यांनी दिली. गेली ३९ वर्षे मुंबई, ठाणे व परिसरात बँकेच्या २५ शाखा, एक विस्तारित कक्ष, २८८७ कोटी रुपयांचा व्यवसाय असा पसारा फैलावला आहे.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘पितांबरी’कडून पाच लाखांचा धनादेश
* महाराष्ट्रातील अभूतपूर्व दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर सामाजिक कर्तव्याच्या भावनेने पितांबरी प्रॉडक्ट्स लि.च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्त साहाय्यता निधीसाठी दिला. या रकमेत कंपनीने स्वत:ची भर घालून रुपये पाच लाखांचा धनादेश अलीकडेच या आपत्तीच्या निवारणासाठी कार्यरत रा. स्व. संघ जनकल्याण समितीला दिला. पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय जोशी यांनी हा धनादेश समितीकडे सुपूर्द केला. जनकल्याण समिती औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ात दीर्घकालीन उपाय म्हणून नागरिकांसाठी पाणी साठवण्याची व्यवस्था व जलसंधारणांच्या योजनांवर काम करीत आहे.
४० व्या वर्षांत पदार्पणानिमित्त जनकल्याण बँकेचे नवीन संकेतस्थळ
* मुंबईत कार्यरत सहकार क्षेत्रातील जनकल्याण बँकेने अलीकडेच ४० व्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्त बँकेच्या मुख्यालयात www.jksbl.com या नवरचित संकेतस्थळाचे उद्घाटन अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या हस्ते झाले. तसेच यानिमित्ताने बँकेने आधारकार्ड संलग्न खाते उघडण्याची सुविधा आपल्या शाखांद्वारे उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-06-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short and important news from business world