अस्थिर, अशाश्वत स्थितीत गुंतवणूकदारांचा सुरक्षित आसरा म्हणून सोने-चांदी मौल्यवान धातू पुन्हा मोल मिळविताना दिसले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने पुन्हा प्रति औंस (३४.५ ग्रॅम) १,२०० अमेरिकी डॉलरच्या भावपातळीला बऱ्याच महिन्यांनंतर गाठले. स्थानिक बाजारातही दिल्लीमध्ये स्टँडर्ड सोने प्रति १० ग्रॅम २७ हजारांच्या वेशीवर गुरुवारी पोहोचले.
मुंबई सराफ बाजारात झालेल्या घाऊक व्यवहारात स्टँडर्ड सोने प्रति १० ग्रॅममागे ३०० रुपयांनी उसळून २६,६९० रुपयांवर गेले, तर चांदी किलोमागे तब्बल ६०० रुपयांनी वधारली. खूप आधी गमावलेला किलोमागे ३९ हजारांचा भाव चांदी पुन्हा प्राप्त करताना आढळून आली.