आजच्या पिढीचे तरूण भारतीय आशावादी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत. आपले आयुष्य कसे असावे, आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे हे त्यांना आधीपासूनच माहित आहे. मात्र दैवाचा खेळ अजब असतो. दैववशात काही घडले आणि त्यांच्याकडे पुरेशी आíथक सुरक्षा नसेल तर त्यांचे तसेच त्यांच्या प्रियजनांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते.
हल्ली महागाई कळसाला पोहोचलेली आहे. पण वाढती महागाई आणि विम्याकरिता नियोजन या गोष्टी वेगवेगळ्या प्रकाशात पाहिल्या जातात. या दोन्हींमधून धडे मिळूनही उपभोक्त्याला या संपूर्ण चित्राकडे पाहता येईलच असे नाही. याकरिता मुख्य नियम असा आहे की तुमचे वार्षकि उत्पन्न वजा तुमची गुंतवणूक आणि कोणत्याही प्रकारचे दायित्व यांच्या १२ पटीत आयुष्य सुरक्षा घ्यायला हवी. तुमचे वाढते उत्पन्न आणि वाढती महागाई याचाही विचार करणे महत्वाचे असते. तुमच्या वाढत्या उत्पन्नामुळे तुमच्या राहणीमानावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. वाढत्या महागाईमुळे एखाद्या व्यक्तीच्या उपभोगावरही अनेक परिणाम होऊ शकतात.
आयुष्य पुढे सरकते तसे तुमच्या कुटुंबाच्या गरजा आणि मागण्यादेखील वाढत जातात. कुटुंबाचा मुख्य म्हणून तुम्ही प्रियजनांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता करणे आणि त्यांना गरजेचा असलेला आरामदायीपणा पुरवणे महत्त्वाचे असते. आयुष्यात अनेक अनपेक्षित घटना घडू शकतात. तो/ती नसतानाही कुटुंबाला तसेच राहणीमान कायम जगता यावे ही प्रत्येकाचीच गरज असते.
त्यामुळे, तुम्ही काही वर्षांकरिताच नियत आयुर्वमिा खरेदी करत असाल तर महागाईचा विचार होणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आकडेमोडीत पशाच्या भविष्यकालीन मूल्याची भूमिका महत्त्वाची असली पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुर्वमिाविषयक गरजांचे सतत म्ल्यांकन करत राहायला हवे.
जर तुम्ही दीर्घ काळाच्या पॉलिसीचा विचार करत असाल जसे – २० किंवा त्याहून अधिक किंवा तुम्ही पूर्ण आयुर्वमिा खरेदी करत आहात तर तुमच्या आकडेमोडीत पशाच्या भविष्यकालीन मूल्याची भूमिका महत्त्वाची असली पाहिजे.
विम्याचा विचार करताना महागाईचा विचार होणे महत्त्वाचे का आहे?
बहुतेक सर्व व्यक्ती विम्याची खरेदी करताना पशाचे भविष्यकालीन मूल्य या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. क्रयशक्तीच्या सर्वसाधारण पातळीच्या तुलनेत किंमतींमध्ये जी वाढ होते तिला महागाईचा दर असे म्हणतात. उपभोक्ता किंमती मोजणारे सीपीआय अणि स्थानिक अर्थव्यवस्थेतील महागाई मोजणारे जीडीपी इन्फ्लेटर महागाई मोजण्याची परिमाणे आहेत.
गेल्या वेळेस नोंदवण्यात आलेला भारतातील महागाईचा दर हा २१०० मधील सप्टेंबरमध्ये ६.१ टक्के इतका होता. १९६९ पासून ते २०१० पर्यंत भारतातील महागाईचा सरासरी दर ७.९ टक्के होता.
अर्थव्यवस्थेतील इतर भागांपेक्षा कितीतरी जास्त पटीत आरोग्यनिगा आणि शिक्षण यांचाही खर्च वाढला आहे. त्यामुळे राहणीमानाकरिता लागणाऱ्या नियमित खर्चाशिवाय शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील महागाईच्या दराचा विचार होणे शहाणपणाचे ठरेल. सर्व वयोगटातील व्यक्तींकरिता महागाई अतिशय धोकादायक ठरते कारण याच पशाचे भविष्यकालीन मूल्य तुमच्या सद्य राहणीमानास पुरे पडेलच असे नाही.
नियत आयुर्वमिा पॉलिसींमध्ये महागाईच्या कालावधीचा विचार
नियत आयुर्वमिा पॉलिसी ही १५, २० किंवा ३० वर्षांच्या दीर्घ कालावधींकरिता घेतली जाते. नियत आयुर्वमिा पॉलिसींकरिता आपण जो दर चुकता करतो तो ठराविक दरच आपल्याला त्या पूर्ण कालावधीमध्ये चुकता करायचा असतो. वार्षकि तत्त्वावर महागाईचा दर ७ टक्के ९ टक्क्यांच्या दरम्यान असल्याने पशाचे मूल्य वर्षांगणिक याच टक्केवारीत घसरत जाते. याचाच अर्थ असा की, रूपयाची क्रय शक्ती कमी होत जाते आणि त्यामुळेच मागील वर्षांच्या तुलनेत पशातून मिळणाऱ्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तीच रक्कम मिळत राहिल याची शाश्वती नसते. आज तुम्ही आयुर्वम्यिाकरिता प्रत्येक महिन्याला जो प्रीमियम भरत आहात तो रूपयांच्या भाषेत तेवढाच राहिल पण महागाईमुळे आजपासून १० वर्षांच्या कालावधीत तो कमी होईल. वानगीदाखल म्हणायचे झाले तर २०११ मध्ये तुम्हाला १० लाख रूपयांमध्ये जे खरेदी करता येईल त्याला ८ टक्के महागाईचा दर राहिल्यास २०१३१मध्ये ४५ लाख रूपये मोजावे लागतील.
उपाययोजना- नियत विमा योजना वाढवणे
हमी देण्यात आलेल्या रक्कमेत (तुमच्या मृत्यूनंतर मिळणारी रोख रक्कम) महागाईच्या दरानुसार प्रत्येक वर्षी ५ टक्के १० टक्के वाढ करण्याची लवचिकता प्रदान करण्याच्या दृष्टीने नियत विमा योजनांमध्ये वाढ करणे फायद्याचे ठरू शकतो. शेवटी खात्रीलायकरित्या मिळणारी रक्कम वाढती असल्याने सद्य राहणीमानाच्या वाढत्या खर्चालाही आवर घालावा लागणार नाही. हा पर्याय तुम्हाला परवडण्याजोग्या किंमतीत पुरेशी आíथक सुरक्षा देऊ करतो. बहुतेक सर्व कंपन्या किमान अतिरिक्त शुल्क आकारून सुयोग्य रायडर पर्यायांसह सुधारित विमा पर्याय पुरवतात. तसेच, तुम्ही धूम्रपान करत नसाल तर तुमच्या निरोगी सवयींबद्दल तुम्हाला बक्षिसही दिले जाते. काही पॉलिसींमध्ये स्त्रियांना खास सवलत देण्यात आलेली असते.
अशा नियत योजना कोणी खरेदी कराव्यात?
जर तुम्ही वाढत्या महागाईबद्दल चिंतीत आहात अणि तुम्ही तुमच्या तरूणपणीच विमा खरेदी करत आहात, उदा. तुमचे स्वतचे कुटुंब सुरू झाले असल्यास, हा तुमच्याकरिता सुयोग्य पर्याय असू शकतो. तुम्हाला शेवटी मिळणाऱ्या खात्रीशीर रक्कमेत वाढ होणार असेल तर तुम्ही भरत असलेल्या प्रीमियममध्येही वाढ होणार हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ही वाढीव रक्कम भरण्यास तुम्ही आíथकदृष्टया सक्षम आहात की नाही याबद्दल तुमची स्वतची खात्री असणे गरजेचे आहे. एखाद्या तज्ञ विमा सल्लागाराशी बोलून तुम्ही अशा प्रकारच्या पॉलिसींबद्दल माहिती मिळवू शकता आणि तुम्हाला तुमच्या नियत आयुर्वमिा योजनेत वाढ करणे खरेच गरजेचे आहे की नाही याबद्दल चर्चा करू शकता.
महागाईचा वाढता दर पाहता एखादी अभिनव पॉलिसी दाखल होणे ही काळाची गरज आहे. अतिशय कार्यक्षम दावा प्रक्रिया सेवा पुरवणाऱ्या विमा पुरवठादारांची निवड हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. विमा कंपनीची कामगिरी पाहायची असेल तर त्यांची दावा प्रक्रियेतील कामगिरी कशी आहे हे पाहणे पुरेसे ठरावे. एखादी विमा योजना खरेदी करण्याचा निर्णय घेताना हा तपास अतिशय महत्त्वाचा ठरतो. दावा हाताळणी प्रक्रियेमध्ये पुरेसे नियामक शासन असते आणि कंपन्यांनी काही ठराविक मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे अपेक्षित असते. यामुळे ग्राहकांना ही माहिती अतिशय सहजपणे मिळून माहितीवर आधारित निर्णय घेणे सोपे जाते.
तुम्ही निवडलेल्या कोणत्याही नियत आयुर्वम्यिाचा महागाईशी थेट परस्पर-संबंध असतो. तुम्ही अतिशय समंजसपणे योजनेची निवड केलीत तर काही अनपेक्षित घटना घडल्यास तर कुटुंबाला महागाईची झळ बसू नये याकरिता पॉलिसीची उत्तम मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा