कोरियाई सॅमसंगने अवघ्या ४,२८० ते ६,४९० रुपयांमध्ये स्मार्ट फोनची ‘रेक्स’ या नावाने नवीन मालिका गुरुवारी नवी दिल्लीत सादर केली. जावा व्यासपीठावर चालणारे हे मोबाईल दुहेरी सिमची सोय असणारे आहेत. ‘सायबरमीडिया रिसर्च’नुसार भारतात जानेवारी ते जून २०१२ दरम्यान एकूण १०.२४ कोटी मोबाईल विकले गेले. त्यामध्ये स्मार्टफोनचा हिस्सा ५५ लाखांचा आहे. नोकियाने वर्षभरापूर्वी सादर केलेल्या ‘आशा’ या मोबाईलच्या स्पर्धेत कंपनीने हा फोन उतरविल्याचे मानले जाते. नोकियाने त्यावेळी सादर केलेल्या १२ विविध आशा मॉडेलच्या किंमती ३,५००ते ८,५०० रुपये दरम्यान आहेत. कंपनीचे आतापर्यंत १.६ लाख आशा मोबाईल विकले गेले आहेत.