आजकालच्या डिजिटल जगामधील गुंतवणूकदारांना ‘माऊस’च्या एका ‘क्लिक’सरशी सर्व माहिती उपलब्ध होते. उद्देश असतो तो केवळ उत्तम आर्थिक प्राप्ती मिळणारी साधने शोधण्याचा. आíथक सल्लागारांमुळे आपल्याला बहुआयामी ‘पोर्टफोलिओ’ तयार करण्यासाठी मदत होते. प्रत्येक ग्राहकाच्या मनात केवळ हाच प्रश्न असतो की, दीर्घकालीन व लघुकालीन कालावधीत ‘स्वत:चा गुंतवणूक निधी कसा तयार करायचा?’ ‘रेस्टॉरन्ट’मधील ‘मेनू कार्ड’मध्ये तुम्ही स्वत:ला काय आवडते ते निवडता. तसेच गुंतवणुकीकरिता तुमच्यासाठी काय योग्य आहे ते निवडणे महत्त्वाचे असते. ग्राहकाला त्याच्या ‘रिस्क प्रोफाईल’नुसार कोणती आíथक गुंतवणूक सोयीची आहे ते निश्चित करणे महत्त्वाचे ठरते.

ग्राहकाच्या ‘रिस्क प्रोफाईल’नुसार, योग्य ‘असेट क्लास’मध्ये गुंतवणूक करणे ठरवता येऊ शकते. त्याचबरोबर कोणत्या प्रमाणात ही गुंतवणूक करता येईल ते ठरविण्यासदेखील मदत होते.
अनेकदा या सर्व गुंतागुंतीमध्ये ‘सहजता’ हरवूनच जाते. २०१२-१३च्या केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे बचत बँक ठेवी एक आकर्षक पर्याय म्हणून समोर आला आहे. याद्वारे बचत बँक ठेवींसाठी ८०टीटीएअंतर्गत असलेल्या तरतुदींचा वापर आपल्याला करता येऊ शकतो आणि १०,००० रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त मिळवू शकतो. बचत ठेवींवर तुमची बँक कोणता व्याजदर देते त्यानुसार, १.६६ लाख रुपये (६%) ते २.५ लाख रुपये (४%) पर्यंत शिल्लक आपल्या खात्यात असल्यास करमाफीची सुविधा मिळवता येते. याचबरोबर ही गुंतवणूक रोख स्वरूपात असल्याने ती एटीएम किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वापरताही येऊ शकते.
वार्षिक ६ टक्के व्याज देणारे बचत खाते हे एखाद्या गुंतवणूकदाराच्या कर रचनेनुसार ९.२ टक्के करपूर्व परतावा देणाऱ्या गुंतवणुकीसमान असू शकते. म्हणून असे बचत खाते हे मुदत ठेवी, रोखे किंवा म्युच्युअल फंड या गुंतवणुकीच्या अन्य साधनांपेक्षा कमी लेखणे योग्य ठरणार नाही.
गुंतवणूकदारांच्या ‘रिस्क प्रोफाईल’प्रमाणे त्यांचा गुंतवणूक निधी वाढविण्यामध्ये अशा प्रकारे बचत खाते मदतनीस ठरते. तुमचा गुंतवणूक निधी साठवताना तुमच्या ‘रिस्क प्रोफाईल’नुसार ‘असेट क्लास’ निवडणे योग्य ठरते. तसेच ज्या ‘असेट क्लास’बद्दल तुम्हाला माहिती आहे त्यातच गुंतवणूक केल्याने त्या ‘असेट क्लास’मध्ये होणाऱ्या संभाव्य बदलांना तुम्ही उत्तम प्रकारे तोंड देऊ शकता.
तुमच्या गुंतवणूक निधीच्या निर्माणासाठी तुम्ही निवडलेले प्रत्येक गुंतवणूक उत्पादन हे तुमच्या संपत्ती निर्मितीच्या ध्येयाशी सुसंगत असायला हवे आणि वेगवेगळी गुंतवणूक उत्पादने ही वेगवेगळ्या कालावधीसाठी तुम्ही याच ध्येयासाठी वापरू शकता. यासाठी तुमच्या सल्लागाराचे सतत मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरते. हे करत असताना शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेत बदल झाल्यास तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची दिशा योग्यरीत्या बदलू शकता. एक गुंतवणूकदार म्हणून एखादे गुंतवणुकीचे साधन तुम्हाला समजलेले नसेल तर याचा अर्थ ते साधन तुमच्यासाठी योग्य नाही. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची शंका येते तेव्हा आपणच आपल्याशी सत्य बोलणे नेहमी योग्य ठरते. आपल्या शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या गोष्टींना जसे आपण वज्र्य मानतो त्याचप्रमाणे आपल्या आíथक आरोग्यासाठी ज्या गुंतवणूकयोग्य नाहीत. त्यांना नकार देणे महत्त्वाचे असते.

लेखक कोटक महिंद्र बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. लेखामधील मतप्रदर्शन हे त्यांचे वैयक्तिक आहे. लेखातून कोटक मिहद्रा बँकेची मते प्रदर्शित होत नाहीत.

Story img Loader