खानपान सेवा आणि व्हाऊचर प्रदाता फ्रेंच कंपनी सोडेक्सोने भारतीय बाजारपेठेतील आपले स्थान आणखी भक्कम बनविताना मॅक्लेलन इंटिग्रेटेड सव्‍‌र्हिसेस इंडिया प्रा. लि. या कंपनीवर ताबा मिळविला आहे. मॅक्लेलेन ही वाहन, आयटी आणि औषधी या सारख्या उद्योगांच्या उत्पादन सुविधांना तांत्रिक व्यवस्थापन व देखभाल सुविधा प्रदान करणारी अग्रेसर कंपनी आहे.
सोडेक्सोचे सध्या देशात ३५० ग्राहक असून, त्यांना तिचे ३४,५०० कर्मचारी विविध ९०० ठिकाणांहून सेवा प्रदान करतात. मॅक्लेलेनवरील ताब्यातून आता कर्मचारीसंख्या ३९ हजारांवर जाणार असून, एकंदर सेवा स्थळे १००० पर्यंत विस्तारली जाणार आहेत. मॅक्लेलेनच्या संपादनापश्चात सोडेक्सोला सध्याच्या १,००० कोटी रुपयांच्या तुलनेत महसुली उलाढाल १,१५० कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे.
२०१५ पर्यंत एकूण महसुलात दोन पटीने तर नफाक्षमतेत तीनपटीने वाढीचे सोडेक्सोचे लक्ष्य आहे, असे सोडेक्सो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑन-साइट सेवा) सुनील नायक यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा