शेअर बाजारातील व्यवहारांचे सार्वत्रिकीकरण, पारदर्शकता आणि गतिमानता ‘डिमॅट’ या संकल्पनेतून घडून आली. एकूणच ‘डिमॅट’बाबत गुंतवणूकदारांमध्ये अनेक गैरधारणा असून त्याचे निराकारण करणाऱ्या मालिकेतील हा दुसरा भाग..
* शेअर्स एकाच्या नावावर असतील व डिमॅट खाते तीन नावावर असेल तर तिघांच्या सह्या लागतील का ?
– मुळात एकाच्या नावावर असलेले शेअर्स तीन व्यक्तींच्या खात्यात डिमॅट करताच येणार नाहीत.
* माझे आजोबा मयत झाले आहेत. त्यांच्या नावावर असलेले शेअर्स कसे डिमॅट करता येतील?
– प्रथम योग्य सरकारी अधिकाऱ्याकडून ‘सक्सेशन सर्टििफकेट’ घ्या व शेअर सर्टििफकेट कंपनीकडे पाठवून तुमच्या नावावर ट्रान्स्फर करून घ्या. मग तुमच्या नावाचे डिमॅट खाते उघडून त्यात ते शेअर्स डिमॅट करा.
* काही कारणाने डिमॅट खातेदाराचे नुकसान झाले तर काय ?
-डिपॉझिटरी/डीपीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे
* एकापेक्षा जास्त नॉमिनी नेमता येतात का ?
– फक्त एकच नॉमिनी
* थोडेसेच शेअर्स ज्याच्याकडे आहेत अशी व्यक्ती डिमॅट खाते न उघडता सर्टििफकेट स्वरूपातील शेअर्स विकू शकेल का ?
– होय. मुंबई स्टॉक एक्स्चेंजने अशा गुंतवणूकदाराना कमाल ५०० शेअर्स – सर्टििफकेट स्वरूपातील विकण्याची परवानगी दिली आहे. तथापि असे शेअर्स विकत घेण्यास सहसा कुणी उत्सुक नसल्यामुळे प्रत्यक्षात ते विकले जाणे कठीणच. शिवाय सर्टििफकेट स्वरूपातील शेअर्सचा भाव डिमॅट शेअर्सपेक्षा कमी असतो.
* तीन व्यक्तींच्या नावे डिमॅट खाते आहे. पहिली व्यक्ती निधन पावली. काय करावे ?
– उर्वरीत दोन व्यक्तींनी त्याच डीपीकडे नवीन डिमॅट खाते उघडावे. त्यानंतर मृत्यू दाखल्यासह एक फॉर्म भरून डीपीकडे दिल्यास मूळ खात्यातील शेअर्स नवीन खात्यात ट्रान्स्फर करून मूळ खाते बंद करावे. याला ट्रान्समिशन असे म्हणतात व त्यावर ट्रान्झॅक्शन चार्ज लावला जात नाही.
* डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया काय आहे?
– बँक खाते उघडण्याइतकेच डिमॅट खाते उघडणे सुलभ आहे. निवासाचा पत्ता, आयडेंटिटी (ओळख) पुरावा, पॅन कार्ड वगैरे कागदपत्रे आणि खातेदाराचा फोटो दिला की झाले.
* डिमॅट खाते उघडण्यास किती खर्च येतो ?
– खाते उघडताना १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर अॅग्रीमेंट करावे लागते. त्याव्यतिरिक्त वार्षकि अकाउंट मेंटेनन्स चार्ज जो सुमारे ३५० रुपये इतका असतो.
* पोस्ट ऑफिसमध्ये डिमॅट खाते उघडता येते का?
– नाही. सीडीएसएलचे मान्यताप्राप्त डीपीच डिमॅट खाते उघडू शकतात. डिपॉझिटरी कायद्यानुसार पोस्ट ऑफिस डीपी म्हणून व्यवसाय करू शकत नाही.
* एकाच कुटुंबातील वेगवेगळय़ा व्यक्तींच्या नावावर शेअर सर्टिफिकेट्स आहेत. ती एकत्रित कशी करावीत?
– याला दोन पर्याय आहेत. वेगवेगळी डिमॅट खाती उघडून सर्व शेअर्स डिमॅट करून घेणे. नंतर कुठल्याही एका खात्यात इतर खात्यातील शेअर्स ट्रान्स्फर करून घेणे व उर्वरीत खाती बंद करणे. सेबीच्या आदेशानुसार डिमॅट खाते बंद करण्यासाठी चार्ज द्यावा लागत नाही. दुसरा मार्ग असा की सर्व सर्टििफकेट्स शेअर ट्रान्स्फर फॉर्म भरून कंपनीकडे पाठवणे व एक अथवा दोन व्यक्तींच्या नावावर ते ट्रान्सफर करून घेणे. त्यानंतर त्या नावाने एकच डिमॅट खाते उघडून त्यात हे सर्व शेअर्स डिमॅट करून घ्यावेत. हे करताना कोणता पर्याय कमी खर्चाचा आहे हे पहावे कारण सर्टििफकेट स्वरूपी शेअर्स ट्रान्स्फर करताना १०० रुपये किंमतीवर २५ पसे या दराने स्टँप डय़ुटी भरावी लागते.
* ऑड लॉट डिमॅटमध्ये विकता येतात का?
– डिमॅट प्रणालीमध्ये सर्व कंपनींचे शेअर्सचा मार्केट लॉट १ असा असतो. त्यामुळे ऑड लॉट ही संकल्पना डिमॅटमध्ये नाही. केवळ त्यामुळेच आज छोटा ग्राहक इन्फोसिससारख्या कंपनीचा एक शेअर विकत घेऊ शकतो.
* डिमॅट चार्जेस प्रत्येक डीपीकडे निरनिराळे का असतात?
– सीडीएसएल आपल्या सर्व डीपींकडून जो चार्ज वसूल करते तो सर्वाना सारखाच असतो. मात्र डीपी आपल्या ग्राहकांना जो चार्ज लावतात तो भिन्न असण्याची अनेक कारणे आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर ‘कनेक्टिव्हिटी कॉस्ट’ डीपीगणिक कमी जास्त असू शकतो. तसेच एखादा शेअर दलाल जर डीपी असेल तर तो आपल्या ग्राहकांना डिमॅट चार्ज कमी लावू शकतो कारण त्याच्याकडेच खरेदी केलेल्या शेअर्सवर ब्रोकरेजच्या रुपाने त्याला फायदा मिळालेला असतो त्यातून तो वजावाट करू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा